परभणी सिरप साठा जप्त

परभणीत नशेसाठी वापरण्यात येणारा सिरपचा साठा जप्त...!

Parbhani syrup stock seized: परभणीतच्या खंडोबा बाजारात रात्रगत पोलिस पथकाने अवैध नशेसाठीच्या वाहतूकाची माहिती मिळवून २ लाख ३० हजार रु.चा साठा जप्त केला.

परभणीत नशेसाठी वापरण्यात येणारा सिरपचा साठा जप्त...!

Parbhani syrup stock seized

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची परभणीतील खंडोबा बाजार परिसरात कारवाई

परभणी (Parbhani syrup stock seized) : रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने गुरुवार २ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास खंडोबा बाजार परिसरात कारवाई करत नशेसाठी वापरण्यात येणार्‍या द्रव्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण २ लाख ३० हजार ८०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन जणांवर नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील पोउपनि. संदीप शिंदे, पोउपनि. अर्जून टरके, पोलीस अंमलदार सुर्यकांत ताटीकोंडलवार, सय्यद इरशाद, यशवंत वाघमारे, असलम शेख, लिंबाजी वावळे यांचे पथक गस्त घालत होते. या पथकाला नानलपेठ पोलीस ठाणे हद्दित खंडोबा बाजार परिसरात काही इसम एका अ‍ॅटोतून नशेसाठी वापरण्यात येणार्‍या सिरपची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी एम.एच. २२ ए.पी. ३७०२ या क्रमांकाचा अ‍ॅटो थांबविला. सदर अ‍ॅटोमध्ये तीन व्यक्ती होत्या. त्यांच्या जवळील साहित्याची तपासणी केली असता त्यांच्याकडे प्रतिबंधित कोडेन फॉस्फट नावाच्या औषधाच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी २ लाख रुपये किंमतीच्या अ‍ॅटोसह औषधीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी अविष्कार विनयकुमार लोखंडे, अतिश राजू जाधव, रोहित अशोक कांबळे यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

अवैध धंद्यांना नानलपेठ पोलिसांचा आश्रय ?
मागील काही दिवसात पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा मोठ्या प्रमाणात कारवाया करत आहेत. नानलपेठ पोलीस ठाणे हद्दित वेश्या व्यवसायापासून अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर कारवाया होत आहेत. पथकाला अवैध धंदे दिसत असताना स्थानिक नानलपेठ पोलिसांनी हे धंदे दिसत नाहीत, असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. अवैध धंदे चालकांना स्थानिक पोलिसांचा आश्रय मिळत असल्याची चर्चा आहे.

संबंधित सामग्री

कोटगुलमध्ये नवी पिढी बरबाद करण्याचे षडयंत्र?

कोटगुलमध्ये नवी पिढी बरबाद करण्याचे षडयंत्र?

Kotgul illegal business: एका बाजूने कोटगुल परिसरातील युवक आदिवासी विभागात उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून लागत आहेत, तर दुसऱ्या बाजूने याच परिसरातील युवकांना अवैध धंद्यात

Aug 30, 2026
परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

Parbhani Illegal sand mining: परभणीत गुंज शिवाराच्या पांढरपानी नद्यापात्रात अवैध वाळू उत्खनन करत असलेल्या सात ट्रॅक्टरांच्या मालकीवर ६० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Aug 21, 2026
परभणीत काळ्या बाजारात जाणारा राशनचा 300 क्विंटल गहू जप्त

परभणीत काळ्या बाजारात जाणारा राशनचा 300 क्विंटल गहू जप्त

Parbhani Wheat Black Market: परभणीतील गंगाखेडमध्ये पोलिसांनी राशनच्या ३०० क्विंटल गहूच्या ट्रकवर कारवाई केली. मुद्देमालासह चालक याव्यतिरिक्त खाजगी वाहन ताब्यात घेतले.

Jun 30, 2026
उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर रसाळ ठरले ‘सिंघम’

उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर रसाळ ठरले ‘सिंघम’

Police Officer Mayur Rasal: उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर रसाळ व डॉ. नीलाभ रोहण यांच्या नेतृत्वाने हिंगोलीत 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये ८ ठिकाणी छापे मारून धंड्यांवर पडली. गुटखा, अवैध दारू, मटका

Jun 16, 2026