परभणी तलवार जप्त

परभणीतील मुळी येथील तरुणाकडून धारदार तलवार जप्त

sword confiscated: परभणीत मुळी येथे विनापरवाना धारदार तलवार असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलीस पथकाने कारवाई करून तलवार जप्त केली आणि तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

परभणीतील मुळी येथील तरुणाकडून धारदार तलवार जप्त

sword confiscated

 

परभणीच्या स्थागुशा पथकाची कारवाई

परभणी (sword confiscated) : गंगाखेड तालुक्यातील मुळी येथील एका तरुणाकडे विनापरवाना बेकायदेशीररित्या धारदार तलवार असल्याची माहिती मिळताच स्थागुशाच्या पथकाने रविवार ३ मे रोजी रात्री केलेल्या कारवाईत तलवार जप्त करत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांची बदली झाल्यानंतर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी परभणी जिल्ह्याच्या पदभार घेताच जिल्ह्यात चालणारे अवैध व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध व विनापरवाना शस्त्र बाडगणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोह. महेश कवठाळे, पोह. राहुल परसोडे, पोह. माणिक वाघ, पोशि. दिलीप निलपत्रेवार, पोशि. शरद सावंत, पोशि. परसराम गायकवाड आदींचे पथक रविवार ३ मे रोजी रात्री गंगाखेड परिसरात गस्तीवर असतांना हे पथक धारखेड येथे आले.

मुळी येथील एका तरुणाजवळ विनापरवाना बेकायदेशीररित्या बाळगलेली तलवार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने या (sword confiscated) पथकाने रविवार रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास मुळी गावातील धारखेड रस्त्यावर पाहणी केली असता झाडाखाली उभ्या असलेल्या सौरभ परमेश्वर कांबळे वय २१ वर्ष याच्याजवळ ३ फुट लांबीची धारदार लोखंडी तलवार मिळून आली. त्यास शस्त्रासह ताब्यात घेऊन गंगाखेड पोलीस ठाण्यात आणून पो.शि. शरद सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सौरभ कांबळे याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन याचा तपास जनदार विनोद चव्हाण हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026