औंढा नागनाथ (Illegal Sand Tipper) : तालुक्यातील सिद्धेश्वर शिवारात अवैध रेती वाहतुकीवर औंढा पोलिसांची कारवाई करून औंढा पोलिसात ८ सप्टेंबर रोजी २ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सारंग त्र्यंबक टोम्पे चालक राहणार सुरवाडी हा दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुमारास रुस्तुम चतुर राठोड यांचे सिद्धेश्वर शिवारातील शेताजवळ विना क्रमांकाचे पिवळ्या रंगाचे टिप्पर मध्ये स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या शासनाचा महसूल बुडवून रेतीचे अवैध उत्खनन करून चोरीची वाळू वाहतूक करीत असताना पोलिसांना आढळून आला.
पोलिसांनी चालकास विचारपूस केली असता उडवा उडवी चे उत्तरे देत असताना पोलिसांनी सदरील टिप्पर पकडला. त्या टिप्पर मध्ये दोन (Illegal Sand Tipper) ब्रास वाळू किंमत दहा हजार रुपये व टिप्पर आठ लाख रुपये असा मिळून आठ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालक व मालक पवन मधुकरराव जाधव रा. केळी तांडा तालुका औंढा यांच्याविरुद्ध जमादार रविकांत हरकाळ यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकामध्ये पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपपोलीस निरीक्षक अमोल इंगोले जमादार रोहिदास राठोड रविकांत हरकाळ यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊपनी, राठोड करीत आहे.