हातभट्टी दारू कारवाई

रेखेगाव जंगल परिसरात हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांची धडक कारवाई

illicit Liquor Action: पोलीस मदत केंद्र घोट अंतर्गत येणाऱ्या रेखेगाव जंगल परिसरात हातभट्टी दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील मोहफुलाच्या सडव्यावर घोट पोलिसांनी धडक कारवाई केली.

रेखेगाव जंगल परिसरात हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांची धडक कारवाई

illicit Liquor Action

 

१,३०० लिटर मोहफुलाचा सडवा नष्ट...

घोट ( illicit Liquor Action) : पोलीस मदत केंद्र घोट अंतर्गत येणाऱ्या रेखेगाव जंगल परिसरात हातभट्टी दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील मोहफुलाच्या सडव्यावर घोट पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १ हजार ३०० लिटर मोहफुलाचा सडवा तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रेखेगाव जंगल परिसरात छापा टाकला असता आरोपी सुशांत परिमल विश्वास (वय ४०,रा. नेताजीनगर) याने हातभट्टी दारू निर्मितीसाठी ७५० लिटर मोहफुलाचा सडवा तयार करून ठेवल्याचे आढळून आले. या (illicit Liquor Action) प्रकरणी सुमारे ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच दुसऱ्या कारवाईत शंकर दयाल पाल (वय ३२, रा. जानाळा) याच्या ताब्यातून ५५० लिटर मोहफुलाचा सडवा,११ प्लास्टिक ड्रम,२ लोखंडी ड्रम व इतर साहित्य असा एकूण ४३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (illicit Liquor Action) दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सदर घटनेच्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्टी दारू व्यवसायाला मोठा आळा बसला असून पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह परिसरात दोन छाप्यांत गुटख्यासह ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीत दोन छाप्यांत गुटखा व तंबाखूसह ३४ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका कारवाईत आरोपीला पकडले, तर दुसऱ्या कारवाईत आरोपी पसार झाले.

Sep 19, 2026
गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

गिरामवाडी शेत शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा

Giramwadi Gambling Raid: तालुक्यातील गिरामवाडी शिवारात सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर १ सप्टेंबरला पोलिसांनी छापा मारून १ लाख ७ हजार ६४० रुपयाचा मुद्देमाल जप्त

Sep 01, 2026
गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!

गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही!

Latur CJP Agitation: गुन्हे दाखल करून तरुणांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशारा देत सीजेपी आंदोलनासाठी वकिलांची फौज तयार आहे, अशी भूमिका एडवोकेट उदय गवारे यांनी एका पत्रकांन्वये

Aug 23, 2026
परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीत बोलेरोतून देशी दारूची वाहतूक; पालम पोलिसांची कारवाई

परभणीतील पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव ते पालम रोडवरील जगदंबा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी बोलेरो वाहनातून नेण्यात येत असलेली अवैध देशी दारू जप्त केली आहे.

Aug 22, 2026
झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

झन्ना-मन्ना जुगारावर छापा; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

तालुक्यातील वाकोडी शिवारात झन्ना-मन्ना जुगारावर पोलिसांनी छापा मारून पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, १ लाख २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Aug 22, 2026