कळमनुरी पोलिस कारवाई  

कळमनुरी पोलिस कोठडीतील आरोपींना घरचे जेवण, फॅन पुरवणाऱ्या पोलिसावर निलंबनाची कारवाई  

Kalamanuri police action: जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींना नियमबाह्य पद्धतीने घरचे जेवण व फॅनची सुविधा पुरवल्याप्रकरणी एका पोलीस शिपायावर निलंबनाची कारव

कळमनुरी पोलिस कोठडीतील आरोपींना घरचे जेवण, फॅन पुरवणाऱ्या पोलिसावर निलंबनाची कारवाई  

Kalamanuri police action

हिंगोली (Kalamanuri police action) : जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींना नियमबाह्य पद्धतीने घरचे जेवण व फॅनची सुविधा पुरवल्याप्रकरणी एका पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी तात्काळ प्रभावाने संबंधित अंमलदाराला सेवेतून निलंबित केले.  

 23 मे 2026 रोजी कळमनुरी पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करून कळमनुरी पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. नियमानुसार कोठडीतील आरोपींना शासकीय पद्धतीने जेवण व इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातात. मात्र, पोलीस स्टेशन कळमनुरी येथे नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई बक्कल नंबर 999 जगन माणिक पवार यांनी नियमांचे उल्लंघन केले.  

शिपाई जगन पवार यांनी कोठडीतील आरोपींना बेकायदेशीररित्या घरचे जेवण तसेच फॅनची सुविधा उपलब्ध करून दिली. इतकेच नाही तर त्यांनी साध्या वेशात जाऊन आरोपींशी थेट संपर्कही साधला. ही बाब समोर आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. तपासात शिपाई पवार यांचा गैरप्रकार स्पष्ट झाल्याने त्यांनी कसुरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. अहवाल प्राप्त होताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी शिस्तभंगाची गंभीर दखल घेत शिपाई जगन माणिक पवार यांना तात्काळ निलंबित केले.  

या (Kalamanuri police action) कारवाईनंतर डॉ. नीलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अंमलदारांना कडक सूचना दिल्या आहेत. कोठडीतील आरोपींशी नियमानुसारच वागणूक देण्यात यावी, त्यांना बेकायदेशीररित्या खाजगी जेवण, पाणी अथवा इतर कोणत्याही सुख-सुविधा पुरवू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अनावश्यक संपर्क पूर्णपणे टाळावा. तपासिक अंमलदार किंवा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय कोठडीतील आरोपींना इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क करू देऊ नये, असेही त्यांनी बजावले आहे. पोलीस दलाची शिस्त व पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या गैरप्रकारांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

परभणीतील पिंपळदरीतील तिघे तर बोरीतील एक पोलीस अंमलदार निलंबीत 

परभणीतील पिंपळदरीतील तिघे तर बोरीतील एक पोलीस अंमलदार निलंबीत 

Parbhani police suspended: पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी पिंपळदरी पोलीस ठाण्यातील तिन आणि बोरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला निलंबीत केले आहे.

Aug 13, 2026
पारडा येथील दांम्पत्याच्या खून प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी

पारडा येथील दांम्पत्याच्या खून प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी

Parda Murder Case: पारडा तालुक्यातील बळीराम व कलावतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपींना अटक केली गेली. गुन्ह्यावरून पोलिसांनी काही मुख्य आरोपींना अटक करण्याचा निर्णय

Jul 05, 2026
कळमनुरी खून प्रकरणातील दोन फरार आरोपी; पाच तासांच्या नाकाबंदीनंतर वाशिममध्ये जेरबंद

कळमनुरी खून प्रकरणातील दोन फरार आरोपी; पाच तासांच्या नाकाबंदीनंतर वाशिममध्ये जेरबंद

Kalmanuri murder case: कळमनुरी खूनमिंडातील दोन मुख्य आरोपी फरार होते. पोलिसांनी पाच तासांची नाकाबंदी करून वाशिम जिल्ह्यातील महामार्गावर त्यांना पकडली.

May 28, 2026