पूर्णा शहर चोरी

परभणीतील पूर्णा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ;ज्वेलर्ससह तीन ठिकाणी चोरी..?

Purna city theft: पूर्णा  शहरातील महावीर नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत धुमाकूळ घालत संतकृपा ज्वेलर्ससह तीन ठिकाणी चोरी, तर एका ग्राहक सेवा केंद्रात चोरीचा प्रयत्न केल्याची घटना

परभणीतील पूर्णा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ;ज्वेलर्ससह तीन ठिकाणी चोरी..?

Purna city theft

 

सोन्या-चांदीचा ऐवज, रोकड लंपास श्वान पथक, ठसे तज्ज्ञ दाखल....!

परभणी (Purna city theft) : पूर्णा  शहरातील महावीर नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत धुमाकूळ घालत संतकृपा ज्वेलर्ससह तीन ठिकाणी चोरी, तर एका ग्राहक सेवा केंद्रात चोरीचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवार २० ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. संतकृपा ज्वेलर्समधून सोन्या-चांदीचा ऐवज, तर दोन ग्राहक सेवा केंद्रांतून रोकड लंपास करण्यात आली. या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

महावीर नगरातील संतकृपा ज्वेलर्सचे मालक हनुमान काळबांडे यांच्या दुकानाची दोन्ही कुलपे तोडून चोरट्यांनी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास दुकानात प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर कुलपे तुटलेल्या अवस्थेत आढळल्याने काळबांडे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पाहणीदरम्यान सोन्या-चांदीचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी कुंदनकुमार वाघमारे तसेच पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांच्या शोधासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्वेलर्सपासून काही अंतरावर असलेल्या शिवा मल्टी सर्विसेस ग्राहक सेवा केंद्राचे कुलूप तोडून गल्ल्यातील अंदाजे २ हजार ९०० ते ३,००० रुपये चोरट्यांनी लंपास केले. कर्मचारी सकाळी नऊच्या सुमारास दुकानात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चालक-मालक विशाल सावंत यांनी याबाबत माहिती दिली. याच परिसरातील पलसिद्ध ग्राहक सेवा केंद्रालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. चालक-मालक शिवदीप बापूआप्पा मेनकुदळे यांच्या माहितीनुसार, फाटक्या नोटा व चिल्लरसह अंदाजे १० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली.

सकाळी दुकानासमोरील साफसफाईसाठी आल्यानंतर दोन्ही बाजूंची कुलपे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्यावरून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.   कनिष्क ऑनलाइन सेवा ग्राहक सेवा केंद्राचे कुलूप तोडण्याचा प्रयत्नही चोरट्यांनी केला, मात्र चोरी करण्यात त्यांना यश आले नाही. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टैग्स: Purna city theft