आरोपीला वसमत ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात
हिंगोली (Vasmat knife Attack) : वसमत तालुक्यातील रुंज येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन चांदू लोखंडे, रा. रुंज ता. वसमत हे 4 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभे होते. याचवेळी आरोपी संदीप किशन बसवंते, रा. रुंज याने गजानन लोखंडे यांच्या घरावर दगड मारल्याचा संशय व्यक्त करत त्यांना शिवीगाळ केली. (Vasmat knife Attack) वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील चाकूने गजानन लोखंडे यांच्या पाठीत वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर गजानन लोखंडे यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात हा गुन्हा विविध कलमान्वये नोंदवण्यात आला आहे. वसमत ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी संदीप बसवंते याला ताब्यात घेतले आहे. या (Vasmat knife Attack) गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक हे करत आहेत.