गौढाळा महिलेच छळ

​गौढाळा येथे विधवा महिलेचा शेजाऱ्याकडून छळ

गौढाळा येथे विधवा आशामती मोतेकर यांच्यावर शेजारी विक्रम नवघरे याने मानसिक छळ केल्याची तक्रार रिसोड पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.

​गौढाळा येथे विधवा महिलेचा शेजाऱ्याकडून छळ

Gaudhala women Harassment

रिसोड पोलिसांत तक्रार दाखल कर्तव्यदक्ष ठाणेदार काय कारवाई करणार? याकडे लक्ष

​रिसोड (Gaudhala women Harassment) : तालुक्यातील गौढाळा येथे एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. पतीच्या निधनानंतर कष्ट करून सन्मानाने जगू पाहणाऱ्या आशामती रामभाऊ मोतेकर (वय ४५) या महिलेला शेजारी राहणाऱ्या एका मद्यधुंद व्यक्तीकडून सतत मानसिक त्रास दिला जात आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रिसोड पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन न्यायाची मागणी केली असून, या घटनेमुळे परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मद्यधुंद शेजाऱ्याचा अतोनात त्रास

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आशामती मोतेकर या आपल्या वयोवृद्ध आईसोबत राहतात. पतीच्या निधनानंतर त्या शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, त्यांच्या शेजारी राहणारा कडुबा विक्रम नवघरे हा व्यक्ती वारंवार दारू पिऊन त्यांच्या घरासमोर येतो आणि विनाकारण शिवीगाळ करतो. किरकोळ कारणावरून वाद उकरून काढणे आणि अपमानास्पद भाषेचा वापर करून पीडितेवर मानसिक दबाव निर्माण करणे, असा या व्यक्तीचा नित्यक्रम झाला असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

​अनेक वेळा समजावून सांगूनही संबंधित व्यक्तीच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. पीडित महिलेने सांगितले की, "मी एकटी महिला असून शांततेत जगण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकदा त्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले, पण आता त्रासाची सीमा ओलांडली गेली आहे. आज तर त्याने असा काही प्रकार केला जो मी शब्दातही मांडू शकत नाही. अखेर नाईलाजाने मला पोलिसांचे दार ठोठावावे लागले." या सततच्या त्रासामुळे पीडिता आणि त्यांची वृद्ध आई प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.

नाभिक समाजात संतापाचे वातावरण

​या (Gaudhala women Harassment) घटनेची माहिती मिळताच नाभिक समाजासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका निराधार महिलेला अशा प्रकारे त्रास दिला जात असल्यामुळे समाज बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. महिलांवरील अशा मानसिक छळाच्या घटना समाजासाठी घातक असून, आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

रिसोड पोलिसांनी याप्रकरणी तक्रार स्वीकारली असून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण हे आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे ते या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीला कायद्याचा हिसका दाखवणार का आणि पीडित महिलेला पूर्ण संरक्षण मिळणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026