औंढा नागनाथ (Country liquor seized) : तालुक्यातील मौजे साळणा जवळील रोड लगत असलेल्या नायरा पेट्रोल पंप जवळ १० ऑगस्ट रोजी ५ वाजेच्या सुमारास कार क्रमांक एमएच- १२ एचझेड ७२१० या नंबरची कार आढळून आली असता सदर गाडीची तपासणी केली. ज्यामध्ये भिंगरी संत्रा असे लेबल असलेले एकूण १० बॉक्समध्ये एकूण ४८० बॉटल आढळून आल्या असता सदर कार ताब्यात घेण्यात आली.
यावेळी आरोपी रवी मारुती सानप हा मिळून आला तर दुसरा आरोपी किशोर जयस्वाल हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान कारसह एकूण ४ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे माधव जिव्हारे यांच्यासह पथकाने केली आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांनी औंढा ना. पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून रवि मारोती सानप रा. साळणा, किशोर जैस्वाल रा. सावंगी ता. औंढा ना. या दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविकांत हरकाळ हे करीत आहेत.
देशी दारू जप्त
साळणा रस्त्यावर कार मधुन १० देशी दारूचे बॉक्स जप्त; गुन्हा दाखल
Country liquor seized: तालुक्यातील मौजे साळणा जवळील रोड लगत असलेल्या नायरा पेट्रोल पंप जवळ १० ऑगस्ट रोजी ५ वाजेच्या सुमारास कार क्रमांक एमएच- १२ एचझेड ७२१० या नंबरची कार आढळून आली
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Country liquor seized