वसमत भीषण अपघात

वसमतमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण अपघातात ठार

Wasmat Terrible Accident: वसमत येथे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले आणि दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या.

वसमतमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण अपघातात ठार

Wasmat Terrible Accident

दोन लहान मुली गंभीर जखमी, वसमत शहरावर शोककळा

वसमत (Wasmat Terrible Accident) : वसमत येथील बुधवार पेठ भागातील रहिवासी व जुने पोस्ट ऑफिस परिसरात असलेल्या हॉटेल चालकाच्या मुलांच्या गाडीला जिंतूर तालुक्यातील चारठाणा गणेश पुर जवळ भयंकर अपघात झाला. यामध्ये शेख मेहबूबभाई दोन मुलं एक सुनबाई, दोन नाती असे पाचजण  ठार झाले असून. दोन जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. ईदमिलन कार्यक्रमासाठी पाहुण्यांना भेटण्यासाठी मंठा येथे जात असताना मंठा रोडवर चारठाणा जवळ जवळील पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी ही भयंकर घटना घडली या (Wasmat Terrible Accident) घटनेमुळे वसमत शहरावर शोककळा पसरली आहे.

वसमत येथील बुधवार पेठ भागातील रहिवासी सय्यद महबूब भाई यांची जुने पोस्ट ऑफिस परिसरात हॉटेल नशेमन नावाची हॉटेल आहे. सय्यद महबूब भाई त्यांचे दोन मुलं, सुनबाई व चार नातवंड   असे सात जणांचे कुटुंब कारमधून मंठा येथे ईद मिलनसाठी बहिणीला भेटण्यासाठी मंठा येथे कारने जात होते. जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळ दुपारच्या वेळी एका मिनी लक्झरी गाडीने क्रमांक एम एच 20 डी डी 76 66 ने डिझायर कार क्रमांक एम एच 12 जीएफ 62 59 ला जोरदार धडक दिली. या (Wasmat Terrible Accident) अपघातात कार मधील सय्यद अझहर, त्यांची पत्नी सुमय्या सय्यद व त्यांच्या दोन चिमुकल्या  मुली जागीच ठार झाले आहेत. तर अजहर यांचा लहान  भाऊ सय्यद इस्माईल यास गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात येत असताना वाटेत त्याचे निधन झाले.

तर कार मधील इतर दोघे लहान मुलं गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भयंकर अपघाताची बातमी वसमत शहरात पसरतात प्रचंड खळबळ उडाली आहे. वसमत शहरावर शोककळा पसरली आहे. हॉटेल चालक सय्यद महबूब भाई व त्यांचे दोन्ही मुलं सय्यद अजहर आणि सय्यद इस्माईल हे वसमत मध्ये अत्यंत मनमिळावू म्हणून प्रसिद्ध आहेत. (Wasmat Terrible Accident) त्यांच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने वसमत शहरातील सर्व स्तरातून हळहळ व दुःख व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी वसमत मधील अनेक मान्यवर घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे जखमी मध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026