वसमत मध्ये दहशतीचे वातावरण; गुंडगिरीला पोलिसांचा धाक राहिला नाही
वसमत (Vasmat Youth Murder) : येथे गँगवार पद्धतीने एका बावीस वर्षीय तरुणाचा भर रस्त्यावर दगड विटांनी हल्ला करून खून करून झाल्याची भयंकर घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर सोमवार पेठ भागात ही घटना घडली यामध्ये २२ वर्षीय तरुण ठार झाला आहे. या प्रकरणात तीन जनाविरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांना टीप का देतो म्हणून हा खून झाला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचेच या प्रकारावरून समोर येत आहे.
वसमत शहरातील सोमवारपेठ परिसरात पोलिसांना टीप का देतो म्हणून गणेश दिगंबर गुंडाळे (वय २२, रा. रूपलापांढरी, ता. पूर्णा हल्ली रा. पाटीलनगर, वसमत त्याच्यावर हल्ला करण्यात आला दगड विटांनी भयंकर हल्ला करून हा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पवन माणिकराव डाखोरे रा. पळसगाव, याने दिलेल्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना टिप का देतोस? म्हणून हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी (Vasmat Youth Murder) पोलिसांनी ऋषिकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी आणि अनिकेत देवकर तिघे राहणार वसमत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने वसमत मध्ये प्रचंड खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे.
वसमत मध्ये गुंडगिरी दहशत शस्त्रधारी टोळ्या वाढल्या आहेत त्यातून अनेक घटना घडत आहेत कठोर कारवाया होत नसल्याने गुंडांचे हिम्मत वाढत आहे त्यातून अशा घटना घडत असल्याने सामान्य नागरिक धास्तावलेले आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक परगेवार आणि पोलीस उपनिरीक्षक बोंडले यांनी भेट देऊन पाहणी केली. आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. अद्याप आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले असल्याचे समोर येत आहे आरोपी अटक झाल्यानंतर या खून प्रकरणामागील नेमके कारण समोर येणार आहे.
पोलिसांना टीप कोणती पोलिसांना टीप का देतोस म्हणून खून केल्या जास्तीचे तक्रारीत नमूद आहे त्यामुळे सदर तरुणांकडून पोलिसांना कोण्या भयंकर गुन्ह्याची व घटनांची टीप मिळत होती , टिप मिळाल्यानंतर पोलिसांनी अशी कोणती धाडसी कारवाई केली हा नवा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा कोणत्या भयंकर घटना व कारवाया आरोपीकडून होत होत्या. त्याची माहिती सदर तरुण पोलिसांना देत होता. त्यातून हा खून झाला.
यासंदर्भात आता चर्चेला उधान आले आहे. पोलिसांना सुद्धा या प्रकरणाचा खुलासा करण्याची वेळ आली आहे. गुन्हेगारी स्वरूपाची कामे करणारी ही टोळी आहे का याचाही तपास होता. (Vasmat Youth Murder) पोलिसांना करावा लागणार आहे. एकंदरीत वसमतमध्ये गुंडगिरी वाढली असून पोलिसांचा धाक राहिला नसल्यासारखी अवस्था आहे.