नुकसानीची केली पाहणी!
मानोरा (Crop Damage) : तालुक्यातील मानोरा महसूल मंडळातील विठोली, बेलोरा सह इतर शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून अखिल भारतीय केंद्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी मानोरा महसूल मंडळातील बेलोरा शिवारात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या पिक नुकसानीची (Crop Damage) पाहणी केली. व पिकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून बाधीत शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे असे शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शेतकऱ्यांना (Farmers) आश्वासीत केले.
शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती!
गेल्या दिड महिन्यापासून वाशिम जिल्हयात सततचा संततधार पाऊस सुरूच आहे. अधूनमधून एक वेळा नव्हे तर चार वेळा ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे संपूर्ण जिल्हायातील शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहे. बुधवारी आकांक्षित वाशिम जिल्ह्यातील अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून दौरा केला. व सोयाबीन, कापूस, संत्रा फळबाग पिकांची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासनाने (Government) सततचा संततधार व ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे पाण्याखाली आलेल्या पिकांचे पंजाबच्या धर्तीवर मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी, सरसकट शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ द्यावा, आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या शेतमजुरांना खावटीची मदत दिवाळी पुर्वी मदत देण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याची बाधीत शेतकरी व शेतमजुरांना आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांच्या नशीबी आलेली ही घोर निराशा आणि हताशाता केवळ शब्दात व्यक्त करणे अशक्य असल्याची भावना ठाकरे यांनी व्यक्त केली. जर दिवाळीपूर्वी राज्य सरकारने अतिवृष्टीची भरीव आर्थिक मदत दिली नाही, तर काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमोल तरोडकर, काँग्रेसचे पदाधिकारी इफ्तेखार पटेल, गजानन राठोड, डॉ निरंजन पाटील, डॉ करसडे, रामनाथ राठोड, वसंता भगत, माजी नगराध्यक्षा बरखा अलताब बेग, शेतकरी विशाल ठाकरे आदीसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कर्जाचे डोंगर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त!
नुकसानीमुळे प्रत्येक शेतकऱ्यावर कर्जाचे मोठे डोंगर वाढले असल्याने त्यांच्या समोर आता जगण्याचा मोठा प्रश्न उभा आहे. त्यांचे मन वेदनांनी भरले असुन या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तात्काळ आर्थिक आधाराची नितांत गरज आहे. त्यामुळे काँग्रेसचे केंद्रीय सदस्य माणिकराव ठाकरे यांनी केंद्र सरकारला या संकट काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.