धान पिकांच्या फुलो-यावर पाणी गेल्याने अतोनात नुकसान!
कोरेगाव, चोप (Crop Damage) : देसाईगंज तालुक्यात कोरेगाव, चोप परीसरात गेल्या अनेक दिवसापासुन अवकाळी पावसाने झोडपल्या मुळे हलक्या प्रजातीच्या धान पिकांच्या फुलो-यावर पाणी गेल्याने अतोनात नुकसान झालेली आहे.
या वर्षी जिल्यातील पर्जनमाणात सर्वात जास्त पावसाची नोंद देसाईगंज तालूक्यात झाली, सुरवाती पासुनच पावसाने चांगला प्रतीसाद दिल्याने धान पीकही जोमात आले. या वर्षी उत्पाटनात वाढ होणार या आशेने शेतकरी (Farmer) वर्ग ही आंनदात होता, हलक्या प्रजाती च्या धानाचे निसवे झाले नी धानपिक फुलोऱ्यावर असतांना, अचानक सतत पाऊस पडल्याने फुलोरा झडला अशातच वादळी पावसाने चांगले झोडपल्याने धानपीक बांधीत पडले नी पाणी साचल्याने, धान पीक ही सडले काही बहुत उरलेला धानपीक पानफोल होनार त्यामुळे शेतकन्यांनी लागवड केलेला खर्चही निघनार नसलाने शेतकरी संकटात पड़ता आहे, लोकांचे देणघेण घरच्या गरजा समोर दीवाळी साजरी करायची कशी या वीवंचनेत शेतकरी पडलेला आहे तरी शासनाने (Government) तात्काळ पंचनामे करून सरसकट नुसकान भरपाई देण्यात यावी असी मागणी कोरेगाव, चोप, शंकरपूर, विसोरा,बोळधा,कसारी, व परिसरातील शेतकर्यानी केलेली आहे.
