लहान येथील केळींच्या बागा जमीनदोस्त!
नांदेड (Crop Damage) : अर्धापूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी उशिरा आलेल्या वादळी वाऱ्याने (Stormy Winds) अक्षरशा कहर केला असून, अनेक गावातील शेतकऱ्यांच्या (Farmers) तोडणीला आलेल्या केळी, पपईच्या बागांना मोठा फटका बसला असून, अनेक शेतकऱ्यांच्या बागा 70 ते 80 टक्के भुई सपाट झालेल्या आहेत. ऐन मृग नक्षत्राच्या (Mrig Nakshatra) सुरुवातीला शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट कोसळले असून शासनाने (Government) आर्थिक मदत (Financial Aid) करावी अशी मागणी होत आहे.
दाभड, अर्धापूर आणि मालेगाव या तीनही मंडळातील शेतीला मोठा फटका!
तालुक्यातील दाभड, अर्धापूर आणि मालेगाव या तीनही मंडळातील शेतीला मोठा फटका बसला असून केळी, पपईच्या बागा (Papaya orchards) भुई सपाट झाल्या आहेत. अर्धापूर तालुक्यातील लहान येथील अन्नपुर्णाबाई बाबुराव इंगळे यांच्या तोडणीला आलेली केळी (Banana) 70 टक्के भुईसपाट झाली असून अंदाजित 4 लाखांचे नुकसान झाले आहे. याच प्रमाणे बालाजी मधुकर नरवाडे, संतोष तुकाराम मोरे, बलराज यदुराज देशमुख साहेबराव स्वामी, बबन घनश्याम मोरे यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.