जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा पिकविमा कंपनीला दणका
हिंगोली (Crop Insurance) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर सर्कल मधील कोंढूर येथील शेतकर्यांनी पिकविमा अर्ज भरले होते. पर्जन्यमानामुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नव्हते.या शेतकर्यांनी इफको टोकीयो कंपनीकडे या शेतकर्यांनी विमा काढलेला असताना मोजक्या शेतकर्यांना अत्यल्प नुकसान भरपाई (Crop Insurance) देऊन इतर शेतकर्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यांना ३४ शेतकर्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली असता त्यांना २७ लाख ९९ हजार ५३६ रुपये पिकविमा संरक्षित रक्कम देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहे.
सन २०१८ मध्ये कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर सर्कल मधील कोंढूर गावातील शेतकर्यांनी पिकविमा अर्ज भरले होते. पावसाचा खंड व अत्यल्प पर्जन्यमान यामुळे शेतक र्यांना अपेक्षीत उत्पन्न झाले नव्हते. शेतकर्यांनी इफको टोकियो कंपनीकडे (Crop Insurance) पिक विमा काढला होता. इफको टोकीयो कंपनीने काही शेतकर्यांना (CLS)CROP LOSS SUrvey आधारे मोजक्या शेतकर्यांना अत्यल्प नुकसान भरपाई दिली होती. व इतर शेतकर्यांकडे दुर्लक्ष केले.त्या आधारे कोंढूर येथील ३४ शेतकर्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचेकडे धाव घेतली.
शासनाने २०१८ साली कळमनुरी तालुक्यामधे दुष्काळ जाहीर केला होता. आखाडा बाळापूर महसूल मंडळामध्ये ७६ दिवसांचा पावसाचा खंड नव्हता असे दर्शविणारा कोणताही पुरावा विरुद्ध पक्ष यांनी दाखल केला नाही व सदर अहवालावर आक्षेप देखील नोंदविण्यात आला नाही. सदर इफको टोकियो कंपनीने पिकविमा रु. २८,००,००० /-( अठ्ठावीस लाख) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग हिंगोलीच्या कार्यालयात जमा केला आहे.त्यामुळे कोंढूर येथील शेतकर्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
आयोगाने शेतकर्यांची बाजू ऐकून घेत सदर ३४ शेतकर्यांना पिक विम्याची (Crop Insurance) रक्कम प्रकरण दाखल केल्यापासून ९ टक्के व्याजदराने मंजूर केली. तसेच शाररीक व मानसिक त्रासापोटी ५००० रु. व तक्रार खर्च म्हणून ५००० रु. देण्यात यावे असे आदेशित केले. सदरील ३४ शेतकर्यांना ४ वर्षानंतर न्याय मिळाला असून शेतकर्यांची सक्षम बाजू अॅड. प्रविण विनायकराव जाधव, हिंगोली यांनी मांडली. अॅड. प्रविण विनायकराव जाधव (देशमुख) यांनी मांडली.
अशी आहेत ३४ शेतकर्यांची नावे व पिकविमा रक्कम
पंजाबराव रावसाहेब पतंगे (रु.७१५५५), पुंजाजी रावसाहेब पतंगे (रु.१०२०९९), नर्सिंग रावसाहेब पतंगे (रु.६२४५१), नंदकिशोर रावसाहेब पतंगे (रु.५६६३२), शारदाबाई अशोकराव माने (रु.६८२९०), तुकाराम अशोक माने (रु.५६६३२), नारायण पुंजाजी माने (रु.१४८५६७), पुंजाजी नारायण माने (रु.५६६३२), पवन पुंजाजी माने (रु.५६६३२), बाबुराव उत्तमराव पतंगे (रु.१२६५८०), सुरेखा बाबुराव पतंगे (रु.१०६०६२), मिनाबाई उत्तमराव पतंगे (रु.६८२९०), बालासाहेब रामराव पतंगे (रु.१६५६३५), गंगाबाई देविदास पतंगे (रु.४५७५७), गजानन बाबुराव पतंगे (रु.१००३५०), अन्नपूर्णा बाबुराव पतंगे (रु.१००३५०), अभिषेक गजानन पतंगे (रु.६९१६५), आदित्य गजानन पतंगे अपाक गजानन बाबुराव पतंगे (रु.६९०१९), केशवराव पंडीतराव पतंगे (रु.५०८०३), कौशल्याबाई बाबुराव चव्हाण (रु.१६७६१७), कैलास केशवराव पतंगे (रु.९८५०७), विठ्ठल केशवराव पतंगे (रु.१०४८९७), प्रकाश रंगराव पतंगे (रु.१०९७००), वैâलास रंगराव पतंगे (रु.५१०३६), विलास रंगराव पतंगे (रु.५१०३६), प्रयागबाई रंगराव पतंगे (रु.१०२३३२), बालाराम माधवराव जाधव (रु.६८२९०), उषा बालाराम जाधव (रु.४०८९४), माधव रुस्तुमराव जाधव (रु.११२५९१), अरविंद केशवराव पतंगे (रु.४४९७४), केशव किशनराव पतंगे (रु.८४५१२), माणिकराव तुकाराम पतंगे (रु.७३५३६), अनिता हिराजी पतंगे (रु.५४११५), संगिता दिपकराव पतंगे (रु.५४११५) अशा ३४ शेतकर्यांना २७ लाख ९९ हजार ५६३ रुपयाचा पिकविमा देण्याचे निर्देश दिले आहेत.
