तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!
मानोरा (Crops Damage) : तालुक्यात मागील काही दिवसापासून वेळोवेळी व दि. 27 मे रोजी सायंकाळी झालेल्या मेघगर्जनेसह अवकाळी मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतीमधील उन्हाळी पिकासह भाजीपाला व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून बाधीत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई (Financial Compensation) द्यावी, असे निवेदन दि. 28 मे रोजी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी (Collector) यांना शेतकऱ्यांनी पाठविले आहे.
सायंकाळच्या सुमारास अतिवृष्टीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली!
निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अतिवृष्टीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत दोन तास पेक्षा अधिक मेघगर्जनेसह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमधील खरीप हंगामासाठी (Kharif Season) मुख्य आधार असलेल्या उन्हाळी बाजरी, ज्वारी, भुईमूग, तीळ आदीसह फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage Crops) झाले आहे. सततच्या अवकाळी पावसाने खरीप पूर्व हंगामाची शेतीमधील कामे खोळंबली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असल्याने सदरील बाबीची तातडीने दखल घेवुन महसूल विभागामार्फत पंचनामा करून आर्थिक सहाय्य, मदतीचे पॅकेज व सवलती देण्यात याव्यात, असे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे. निवेदन देतेवेळी बाजार समितीचे सभापती शेतकरी डॉ संजय रोठे, राजु गुल्हाने, इराम जाधव, हमीद खा, दाऊद खा, गोविंदराव काजळे, रुक्मिणा काजळे, यश ठाकरे, संगीता ठाकरे, श्रीकृफ्तेखार पटेल, गोपाल भोयर, विक्रांत देशमुख, प्रा हेमंत देशमुख, आशिष पाटील, संतोष भोयर, शब्बीर खा दाऊद खा, तुळशीष्ण साखरकर, आशिष काजळे, प्रकाश जाधव, दारासिंग जाधव यांच्यासह इतर शेतकरी (Farmer) उपस्थित होते.