मानोरा (Credit Institutions) : गरीब होतकरू छोटे व्यावसायिक व मोठ्या व्यवसायीकांना आर्थिक मदत देऊन संस्थेने स्वतःचा व लोकांचाही विकास साधावा, तसेच ग्राहकांना सुलभ सेवा द्यावी, असे प्रतिपादन मोहनीताई नाईक (Mohinitai Naik) यांनी दि. ३० मार्च रोजी मानोरा शहरात पोहरादेवी (Credit Institutions) पतसंस्थाच्या शुभारंभाच्या प्रसंगी केले.
मानोरा शहरात मराठी नववर्षाच्या पावन पर्वावर पोहरादेवी (Credit Institutions) अर्बन क्रेडीट सोसायटीचा शुभांरभ सोहळा (Mohinitai Naik) मोहीनीताई नाईक यांच्या शुभहस्ते व शास्त्री महाराज, चैतन्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मंचकावर चैतन्य महाराज कन्नड , शास्त्री महाराज आळंदी महंत सुनील महाराज, राजेश नेमाने, चंद्रकांत राठोड, वऱ्हाडे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना नाईक म्हणाल्या की, तालुक्यातील पोहरादेवी गावाने धार्मीक व राजकीय क्षेत्रात नावलौकीक प्राप्त केला आहे.
पोहरादेवी परीसरातील युवकांनी पुढे येवून आज मानोरा शहरात पोहरादेवी (Credit Institutions) अर्बन क्रेडीट सोसायटी स्थापन करुन आपल्या गावाचे नाव पुढे नेण्याचे काम केले आहे. सामान्य जनतेचे पैसे सस्थेत ठेवत असतांना पारदर्शकता व प्रामणिकता ठेवली तर संस्थेचे रोपटे वटवृक्षात व्हायला वेळ लागणार नाही, असे सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विशाल राठोड, उपाध्यक्ष पवन चव्हाण, संचालक श्रीकांत चव्हाण, संचालिका दर्शना राठोड, भाऊराव जाधव, जय पवार, अश्विन शिकारे, उमेश हरसुले, पांडुरंग मनोहर, विनोद बोचरे, जयश्री विशाल राठोड, सीमा पवन चव्हाण आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकाची उपस्थिती होती.