आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!
मानोरा (Cylinder Theft) : तालुक्यातील देऊरवाडी शिवारातील जय पोहरादेवी इंडेन गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून दि. १२ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास ८५ गॅस सिलेंडर लंपास झाल्याची घटना घडली. पोलिसात दाखल तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.
सविस्तर असे की, मानोरा येथील जय पोहरादेवी इंडेन गॅस एजन्सीचे (Indane Gas Agency) गोडाऊन माहुली देऊरवाडी शिवारात आहे. रविवारी ( दि. १२ ) ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास ८५ गॅस सिलेंडर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. अंदाजे दोन लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास झाल्याची माहिती प्राप्त झाली असुन सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावरून त्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असुन दाखल तक्रारीनुसार दोन दिवसानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी कलम १३४ ( १ ), ३०५ ( १ ), बी एन एस अन्वये गुन्हा दाखल करून चोरीचा अधिक तपास मानोरा पोलीस करीत आहे.