नवी दिल्ली (DA Hike) : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees) मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या (DA Hike) महागाई भत्त्यात (DA) 2% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% पर्यंत वाढेल. शेवटचा महागाई भत्ता जुलै 2024 मध्ये वाढला होता. जेव्हा तो 50% वरून 53% करण्यात आला होता. या बदलाचा उद्देश (Central Employees) कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देणे आहे.
महागाई भत्ता वाढीचा कोणाला फायदा?
महागाई भत्त्यात वाढ केल्याने केंद्र सरकारी कर्मचारी (Central Employees), निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. आज शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता (DA Hike) वाढीचा निर्णय घेण्यात आला. आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली आहे, याचा फायदा सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 66 लाख पेन्शनधारकांना होईल. आता प्रश्न असा आहे की, कर्मचाऱ्यांचा पगार आता किती आहे? तर हे अशा प्रकारे समजून घ्या, जर एखाद्या (Central Employees) कर्मचाऱ्याचा मूळ पगार दहा हजार रुपये असेल, तर या वाढीनंतर त्याच्या खात्यात (DA Hike) महागाई भत्ता म्हणून 5500 रुपये येतील.
#Cabinet approves release of an additional instalment of Dearness Allowance to Central Government employees and Dearness Relief to Pensioners w.e.f. 01.01.2025#CabinetDecisions pic.twitter.com/7gJT60D4Qh
— Dhirendra Ojha (@DG_PIB) March 28, 2025
तीन महिन्यांच्या थकबाकीसह पगार मिळणार
ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. परंतु विशेष म्हणजे डीएची घोषणा करण्यास विलंब झाला होता. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पगारात गेल्या तीन महिन्यांच्या (जानेवारी-मार्च 2025) थकबाकीसह वाढलेला (DA Hike) डीए समाविष्ट असेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल रोजी थकबाकीसह वाढलेला पगार मिळेल. प्रत्यक्षात डीएचे पूर्ण नाव “डियरनेस अलाउंस” (Dearness Allowance) आहे, ज्याला इंग्रजीत डिअरनेस अलाउंस म्हणतात. सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना (Central Employees) आणि पेन्शनधारकांना आर्थिक भत्ता देते. जो त्यांच्या पगारात अतिरिक्त रक्कम म्हणून जोडला जातो. (DA Hike) डीए हा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) च्या आधारावर निश्चित केला जातो आणि म्हणूनच तो वेळोवेळी बदलत राहतो.