उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पुरबधित करंजा गावाच्या शिंदे व करळे वस्तीची पाहणी
धाराशिव (DCM Eknath Shinde) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा तालुक्यातील पुरबधित करंजा गावाच्या शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व उपस्थित वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून झालेल्या शेतीच्या नुकसानीची व मालमत्तेच्या नुकसानीची माहिती घेतली.
ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेतली नुकसानीची माहिती
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) , जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, सहायक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे व तहसीलदार नीलेश काकडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मान्यवरांनी यावेळी करंजा गावाजवळील शिंदे वस्तीतील चांगदेव शिंदे यांच्या पुरबधित घराची पाहणी केली. या वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी शिंदे यांचेकडे बाधित वस्तीतील लोकांनी केली असता नक्कीच आपले पुनर्वसन करण्यात येईल, याची ग्वाही (DCM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
या अस्मानी संकटात आपले सरकार सर्व नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे..
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी! pic.twitter.com/dJkJ0L0CYN
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2025
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यावेळी म्हणाले की, बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना तात्पुरती लवकरच मदत करण्यात येईल. तसेच पंचनामे करून मदत देण्यात येईल. अटी व निकष यामध्ये शिथिलता आणण्यात येईल. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये. मदतीपासून कोणीही वंचीत राहणार नाही. जमीन पूर्णता खरडून गेली आहे,याबाबत मदतीचे निकष बदलविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
📍 #धाराशिव |
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या करंजा गावातील शिंदे व करळे वस्तीतील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने स्थानिक वाड्या वस्त्यांचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक… pic.twitter.com/6awyK4elvF
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2025
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) पुढे म्हणाले की, बाधितांना आता मदतीची आवश्यकता असून प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत करावी. नैसर्गिक आपत्ती कोसळली असून अशाप्रकारच्या संकटांना न घाबरता धीर धरावा. सरकार म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारची मदत देऊन जनतेला आधार देण्यात येईल. पंचनाम्यानंतर नुकसानीची तीव्रता समोर आल्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी बधितांना आश्वस्त केले.
करंजा गावाचा भाग असलेल्या शिंदे (DCM Eknath Shinde) वस्तीतील पोलीस पाटील बाळासाहेब चांगदेव शिंदे यांच्या घराचे पूर्णता नुकसान झाले असून शिंदे यांच्यासह पालकमंत्री सरनाईक, आरोग्यमंत्री आबिटकर व आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांनी त्यांच्या घरात जाऊन संसारोपयोगी साहित्याच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच जवळच्या करळेवस्तीला एनडिआरएफच्या बोटीने जाऊन भेट दिली व बाधित वस्तीतील लोकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. त्यांना धीर देऊन मदतीची ग्वाही दिली.