Digras suicide :- शेती करण्यासाठी पैसा अडका नसल्याच्या कारणाने आपली शेती (Farm)यावर्षी पडीक राहील व आपल्याला उत्पन्न मिळणार नाही. या विवंचनेत असलेल्या तालुक्यातील फुलवाडी येथील शेत एका शेतकर्याने त्यांच्या राहत्या घरी स्बबच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना ३० जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली.
हुकाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या
दिनेश पांडुरंग राठोड (३६) रा. फुलवाडी असे गळफास घेऊन आत्महत्या करणार्या शेतकर्याचे नाव आहे. दिनेश याची पत्नी माहेरी होती. तर त्याचे आईवडील घराबाहेर बसुन होते. यावेळी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, सोसायटी, बँकेचे कर्ज (Bank Loan)व खाजगी कर्ज तसेच यावर्षी शेती पिकापासून वंचित राहणार असल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे ही नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह (dead body) शवविच्छेदनासाठी (Autopsy) ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई, वडील एक भाऊ, चार विवाहित बहिणी, पत्नी, ३ मुली, १ मुलगा, असा परिवार आहे.