देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Maharashtra Farmers: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांद्वारे जैवतंत्रज्ञानाची मागणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Maharashtra Farmers: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांद्वारे जैवतंत्रज्ञानाची मागणी
विदर्भनागपूरशेती

Maharashtra Farmers: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांद्वारे जैवतंत्रज्ञानाची मागणी

Deshonnati Digital
Last updated: 2025/03/06 at 6:13 PM
By Deshonnati Digital Published March 6, 2025
Share
Maharashtra Farmers

जागतिक स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी कापसाचे उत्पादन वाढविण्यावर भर

नागपूर (Maharashtra Farmers) : भारतातील कृषी क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकऱ्यांनी विज्ञानाधारित धोरणांची मागणी केली असून प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपला हक्क अधोरेखित केला आहे. नॅशनल फार्मर्स एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्ह अर्थात एनएफईआयच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शाश्वत आणि उत्पादनक्षम शेतीसाठी (Biotechnology) जैव तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला.

सारांश
जागतिक स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी कापसाचे उत्पादन वाढविण्यावर भरनॅशनल फार्मर्स एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्हद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन

नॅशनल फार्मर्स एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्हद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन

विविध जिल्ह्यांतील (Maharashtra Farmers) शेतकऱ्यांनी जैव तंत्रज्ञानासह अनुवांशिकरित्या सुधारित (जीएम) वाणांची पिके उपलब्ध करून देण्याची मागणी केली. इतर क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग होत असेल तर शेती सुद्धा मागे राहता काम नये असे त्यांचे म्हणणे आहे. जीएम पिकांमुळे कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा अधिक वापर होत असल्याचा समज चुकीचा असून, जगभरात या पिकांच्या लागवडीमुळे प्रत्यक्षात रासायनिक वापर कमी झाला आहे, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना यांसारख्या देशांतील शेतकरी अनेक वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत, पण भारतीय शेतकरी अद्याप त्यापासून वंचित आहेत, असे त्यांनी सांगितले.

वांगे, मोहरी, कलिंगड आणि सोयाबीन यांसारख्या पिकांसाठी (Biotechnology) जैवतंत्रज्ञानाची मागणी होत असतानाच, शेतकऱ्यांनी कापसाचे महत्त्व अधोरेखित केले आणि नवीन बीटी वाण आणण्याची गरज असल्याचे सांगितले. (Maharashtra Farmers) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन अर्थात एमटीटीएम स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. या योजनेत कापूस हा मुख्य कच्चा माल असल्याने राज्यातील ३०-४० लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे.

गेल्या काही वर्षात कीटकांच्या आव्हानामुळे आणि हवामान बदलामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे अथवा जेवढ्यास तेवढेच राहिले आहे त्यामुळे अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर तातडीने करणे गरजेचे आहे. कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी, कच्चा मालाचा सातत्यपूर्ण पुरवठा निश्चित करण्यासाठी आणि नवीन किडींशी लढा देण्यासाठी प्रगत बीटी कापसाची अत्यंत गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अकोल्याचे कापूस उत्पादक गणेश नानोटे यांनी सांगितले की बीटी कापसामधील क्राय एसी विषाणूमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रतिकार वाढत आहे. “बीटी कापसामुळे आमची उत्पादकता वाढली असली तरी किडीचा प्रादुर्भाव देखील होत आहे. भारताने जुनी तंत्रज्ञान मर्यादा ओलांडून आधुनिक कृषी आव्हानांना तोंड देणारे नवीन वाण स्वीकारायला हवेत,” असे त्यांनी सांगितले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्ये आधीच तणनाशक सहन करू शकणारे बीटी (एचटीबीटी) कापूस वाण उपलब्ध आहे, मग भारतीय शेतकऱ्यांना तेच तंत्रज्ञान का मिळू नये?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले की हा विषय केवळ विज्ञानावर आधारित नाही, तर त्यांच्या (Biotechnology) तंत्रज्ञान निवडीच्या हक्काशी संबंधित आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खैरगाव येथील प्रगतशील शेतकरी नेमराज जगन्नाथ राजूरकर यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले, “मी गेल्या ३० वर्षांपासून कापूस पिकवतो आहे. २००० च्या सुरुवातीला कापसाचे उत्पादन घसरले होते, पण बीटी वाण आल्यामुळे शेतकरी तारल्या गेला आणि भारत जगातील प्रमुख कापूस निर्यातदार बनला. जैव तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून देण्यासह अन्न, वस्त्र, आणि पशुखाद्याची गरज भागवण्यास मदत केली आहे.”

राजूरकर यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे (Biotechnology) जैवतंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात झालेले आमूलाग्र बदलाव उपस्थितांना सांगितले. बीटी वाणाच्या कापसामुळे कीटकनाशकांची गरज कमी झाली, कापूस लागवड अधिक शाश्वत होत उत्पादन वाढले आणि भारतीय कृषी क्षेत्रात क्रांती घडून आल्याचे त्यांनी सांगितले. पण त्याचबरोबर त्यांनी हेही अधोरेखित केले की कापसावर हे तंत्रज्ञान लागू करण्यात यश आले असले तरी इतर पिकांसाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात अडसर आणला जात आहे. “आम्हाला वांगी, कलिंगड आणि सोयाबीनचे अनुवांशिकतीत्या संकरित केलेले(जीएम) वाण हवे आहेत. पण प्रगतीच्या ऐवजी आम्ही चुकीच्या माहिती आणि राजकीय अडथळ्यांमध्ये अडकलो आहोत,” असे त्यांनी सांगितले.

यवतमाळचे शेतकरी प्रकाश बी. पु्प्पलवार यांनी सांगितले की, “भारतीय शेतकरी जगातील कोणत्याही (Maharashtra Farmers) शेतकऱ्यांशी स्पर्धा करण्यास सक्षम आहे. भारतातील लाखो शेतकऱ्यांच्या आकांशा ‘विकसित भारताकरिता विकसित कृषी’ या संकल्पनेशी जोडल्या गेल्या आहेत आणि हे जर प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर उत्पादन वाढवण्यासाठी, जगातील सर्वोत्तम शेती पद्धतींशी जुळवून घेण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी आपण (Biotechnology) जैव तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. भारतीय शेतीकडे जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे, फक्त योग्य साधने आणि तंत्रज्ञान हवे.”

यावेळी त्यांनी खेद व्यक्त करत असेही म्हटले कि, “शेतीसंबंधी निर्णय असे लोक घेत आहेत, जे कधीच शेतात पाऊल देखील ठेवत नाही. ते कोणत्याही वैज्ञानिक तथ्यांशिवाय शेतकऱ्यांमध्ये भीती पसरवतात. आपल्यासाठी काय चांगले आहे हे ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांनाच असायला हवा.” यावेळी शेतकऱ्यांनी उत्पादकतेपलीकडे, प्रगत जैवतंत्रज्ञानाच्या शाश्वत फायद्यांवर भर दिला. नवीन बीटी आणि एचटीबीटी कापूस वाण उपलब्ध झाल्यास कीटकनाशकांची गरज कमी होऊ शकेल, खर्च कमी होईल आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी होतील. हवामान बदलामुळे नव्या समस्या निर्माण होत असताना, तंत्रज्ञानाधारित उपाय शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासोबतच मातीचे आरोग्य जपण्यासाठी आणि पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करू शकतात.

बाहेरील दबाव गटांच्या प्रभावाखाली न राहता धोरणनिर्मात्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घ्याव्यात, असे आवाहन शेतकऱ्यांनी यावेळी केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की भारताचे कृषी क्षेत्र जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यासाठी विज्ञानाधारित सुधारणांचा स्वीकार अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या (Biotechnology) मदतीने उत्पादन वाढवून वस्त्रोद्योगासारख्या क्षेत्रांसाठी सातत्यपूर्ण कच्चामाल पुरवठा करता येईल, खर्च कमी होईल, आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे त्यांनी अधोरेखित केले. शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी नवकल्पना हवी, आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळालाच पाहिजे जेणेकरून त्यांना बदलत्या आर्थिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत यशस्वी होण्यास मदत होईल.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Biotechnology, Maharashtra Farmers
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ganesh Festival
अध्यात्मबुलडाणामहाराष्ट्रविदर्भ

Ganesh Festival: बाप्पाची चांदी…शिवस्मारकातील ‘गणेशमूर्ती’ रुद्र मंडळाने मढवली चांदीने!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 31, 2025
Nitin Gadkari: नवीन इंधन कार्यक्षमता नियम CAFE 3, नेमकं काय? ते जाणून घ्या.
E-pos Machine: ई पॉस मशीनचा डाटा न आल्याने १९० दुकानावरील तांदुळ वाटप रखडले
Abha Pande: आभा पांडे बिघडविणार का पूर्व नागपूरचे गणित..?
Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?