शिंदे सरकारच्या काळात जिल्ह्याला मिळाला भरीव निधी- ना. जाधव
बुलढाणा (Eknath shinde) : शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी दिलेल्या मंत्री पदामुळे देशभर काम करण्याची संधी मिळाली, असे केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी सांगून, शिंदे साहेब मुख्यमंत्री असतांना केवळ बुलढाणा शहरालाच नाहीतर जिल्ह्यातील सर्व शहरांना विकासासाठी अपेक्षेपेक्षा खूप जास्त निधी मिळाला..असे प्रतिपादन ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी केले.
काश्मीर मधील पहलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील व इतर राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप त्यांच्या घरी पोहचविलेल्या ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांच्या कार्याची शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी त्यांच्या भाषणात दखल घेऊन स्तुती केली.
रविवार २७ एप्रिल रोजी शिवसेना पक्ष मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे आभार दौरा निमित्त बुलढाणा येथे आले असता, जाहिर सभेत ते बोलत होते. काश्मीरमध्ये झालेल्या आंतकी हल्ल्यात २६ निष्पाप नागरीक मारल्या गेले, त्यात ६ जण महाराष्ट्रातील होते. या हल्ल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ५१ पर्यटक जम्मू आणि काश्मीर अडकून पडले होते. त्यांना सुखरूप आणण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) स्वत: जम्मू आणि काश्मीर मध्ये जावून त्यांची भेट घेत त्यांची सर्व व्यवस्था केली. त्यांना जम्मू काश्मीर ते दिल्ली आणि तेथून भुसावळ पर्यंत रेल्वेने सुखरूप आणले.
केंद्रीय मंत्रीमंडळात मला शिवसेनेचे मुख्य नेते शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) साहेब यांनी मला मंत्रीपदी बसविले. त्यांनी दिलेल्या या संधी मुळे मला देशभर काम करण्याची संधी मिळाली असून यामुळे जनतेची सेवा करुन संधीचे सोने करेल, असे प्रतिपादन यावेळी ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी केले. बुलढाणा लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही मतदार संघात शिवसेना विजयी झाली, त्याबद्दल ना. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी यावेळी सर्व जनतेचे आभार मानले. ना. गुलाबराव पाटील, ना. संजय राठोड, आ. संजय गायकवाड, ज्योती वाघमारे यांच्यासह माजी आमदार व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
दरे गावी नॅचरोपॅथी सेंटर..
दरे गावी नॅचरोपॅथी सेंटर व ठाण्यातील आयुर्वेदा दिल्याचाही उल्लेख यावेळी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केला. शिंदे यांचे मुळगाव सातारा जिल्ह्यातील दरे गाव हे आहे. त्या ठिकाणी ना.प्रतापराव जाधव यांनी नॅचरोपॅथी सेंटर मंजूर केले तसेच ठाण्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा मंजूर करण्यात आले. या कामांचा सुद्धा ना.एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी उल्लेख करून ना. जाधव (Prataprav Jadhav) यांचे कौतुक केले.
मिळालेल्या संधीचे सोने करेल..
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अभद्र युतीनंतर राज्यात झालेल्या उठावानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने मला विजयाचा चौकार मारता आला. याबाबत मी बुलढाणा लोकसभा मतदार संघातील सर्व जनतेचा ऋणी आहे. त्यांचे मानावे तेव्हढे आभार कमीच आहे, असे ऋण प्रतापरावांनी व्यक्त करुन एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळालेल्या केद्रीय मंत्री पदाचे सोने करेल, असे सांगितले.
हेलिपॅडवर केले स्वागत..
बुलढाणा येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते ना. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या आभार दौरा निमित्त मातृतिर्थ बुलढाणा जिल्हा आगमन प्रंसगी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) साहेब यांना स्वागत केले.