बुलढाणा (Deputy CM Eknath Shinde) : पहलगाम हल्ला भारतावरचा हल्ला आहे, तो हल्ला देशाच्या आत्म्यावर हल्ला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलयं. या हल्ल्यात २७ पर्यटक शहिद झाले असून, त्यातले ६ महाराष्ट्रातील आहे. अनेक पर्यटक त्यावेळी काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना आधार देण्याची गरज होती.
खा. श्रीकांत शिंदे त्यांची मेडिकलची टीम घेवून पोहचले होते, गिरीष महाजनही राज्य शासनाच्या वतीने गेले होते तर केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव सुध्दा तिथे गेले होते. त्यातही विरोधक राजकारण करत आहे, हे दुदैवी आहे. पाकड्यांना भारत धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, त्यांचे नामोनिशाण मिटविले जाईल, घरात घुसून मारनेवाला हा भारत असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी सांगून.. करारा जवाब मिलेगा, असं पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठणकावलं ते बुलढाणा सभेतून!
उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांचा आज २७ एप्रिल रोजी बुलढाणा येथे ‘आभार दौरा’ होता, तेंव्हा आभाराच्या जाहिर सभेतून ते बोलत होते. मंचावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील, ना. संजय राठोड, आ. संजय गायकवाड यांच्यासह माजी आ. संजय रायमूलकर व शशिकांत खेडेकर यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री तथा जिल्ह्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सभेच्या आरंभीच पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कोणाचाही सत्कार यावेळी ठेवण्यात आला नाही. सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा भर हा काश्मीवरचं केंद्रीत होता.
ना. एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) पुढे म्हणाले की, जे पाकीस्तानी नागरिक अवैधरित्या महाराष्ट्रात राहत आहे त्यांनी त्वरीत चालते व्हावे. नाहीतर पोलिस शोधतील अन् जागेवरच ठोकतील. ही आरपारची लढाई आहे. आता पाकीस्तानला धडा शिकवल्याशिवाय भारत राहणार नाही, असे त्यांनी सांगून ‘करारा जवाब मिलेगा..’ असं पाकीस्तानला ठणकावलं.
ना. गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदेच्या (Deputy CM Eknath Shinde) काश्मीरला जाण्यावरुन विरोधक करत असलेल्या टिकेचा खरपूस समाचार घेतला. शिंदे साहेबांचा मुलगा मदतीसाठी आधीच कश्मीरला गेला होता, हे संजय राऊतच्या बापालाही माहिती नसेल.. अशी टिका त्यांनी करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Deputy CM Eknath Shinde) सरकारी विमानाने तर अनेकांना आणलेच पण स्वत:च्या खिश्यातून पैसे खर्च करत ३ विमानातूनही अनेक पर्यटकांना महाराष्ट्रात आणलं. कुठल्याही आपत्तीत धावून जाणारे शिंदे असून ते घरात बसून फेसबूकवरुन काम करत नाही, असा टोलाही ना. गुलाबराव पाटील यांनी लगावला.
तब तक भारत माता का आँचल नीलाम नहीं होने देंगे..
आधी ना. गुलाबराव पाटील तर नंतर ना.एकनाथ शिंदे यांनी पाकीस्तानविरुध्द शेरो-शायरी करुन सभेमध्ये जोश भरला.‘रात का तारा है तारा ही रहेगा, जन्मो तक नजारा है नजारा ही रहेगा.. दहशत सें ना डरे है हम ना डरेंगे, कश्मीर हमारा है हमाराही रहेगा!’ हा शेर आधी भाषणात ना. गुलाबराव पाटील यांनी म्हटल्यावर एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनीही त्यांच्या भाषणात शेर म्हटले. ‘लहू का कतरा तिरंगा बन जायेंगा,जो हम पे वार करेंगा वो मिटा दिया जायेगा..अब कोई हद नही सरहद नही, जो आग लगायेंगा उसको जला दिया जायेगा!’ या शायरीसह भाषणाच्या शेवटी ‘आजादी की कभी शाम नहीं होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे..बची हो जो एक बूंद भी लहू की, तब तक भारत माता का आँचल नीलाम नहीं होने देंगे!’ हा शेर म्हटला.