कार्यकर्त्यांच्या निवडणुका एकजुटीने जिंकायच्या आहेत
हिंगोली (Deputy CM Eknath Shinde) : महायुतीने राज्य जिंकले, देश ही जिंकला, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुका एकजुटीने जिंकायच्या आहेत. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ते हिंगोलीत आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या कावड यात्रेला जमलेल्या जनसमुदायाला संबोंधीत करीत होते.
आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी सुरू केलेली कावड यात्रा (Kavad Yatra) ही देशभर हिंदुत्वाचा जागर बनली आहे. ही कावड यात्रा सनातन धर्माचे प्रतिक असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले, कावड यात्रेकडे ज्यांनी पाठ फिरविली त्यांची राजकीय यात्रा संपली, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला. राज्यात ‘ ऑपरेशन तख्तापलट ’ करून आम्ही कॉग्रेसच्या जोखडाला बांधलेली शिवसेना मुक्त केली. असा पुर्नविचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पतपधान नरेंद्र मोदींनींनी इट का जवाब पत्थर से दिला.
विरोधकांनी सेनेच्या कर्तत्वावर प्रश्न उपस्थित केला, हा देशद्रोह आहे, असे ते म्हणाले. यापुवीच्या बॉम्ब स्फोटांचा जवाब हे विरोधक देतील का, असा सवाल करीत भगवा दहशतवादचा आरोप करणार्या विरोधकांचे तोंड न्यायालयानेच बंद केले, असे ते म्हणाले. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली तेव्हा विरोधकांना पोटशुळ उठले. या प्रयत्नाला चुनावी जुमला सांगून हिणवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. महायुती सरकारने मात्र लाडक्या बहिणींना मदत सुरू केली आणि ती मदत यापुढे ही सुरू राहिल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.या लाडक्या बहिणींनी विरोधकांना चारी मुंड्या चित केले, असा उपहास ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर आ. हेमंत पाटील, आ.बाबुराव पाटील कोहळीकर, युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम, हिंगोली न.प.गट नेते श्रीराम बांगर, माजी खा.सुभाष वानखेडे, नगरसेवक गणेश बांगर, नगरसेवक सुभाष बांगर, संजय बोंढारे पाटील, जयदिप काकडे, राजु चापके, अॅड. पंजाब चव्हाण, गुड्डु बांगर, रत्नाकर उर्पेâ खली बांगर, सुमित कांबळे, माजी सभापती फकिरा मुंढे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी केले. ज्यामध्ये एकनाथ भाई शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांची मनोकामना संपुर्णपणे पुर्ण व्हावी असे साकडे भोल्या शंकराकडे घातले. सभेला मोठ्या संख्येने शिवभक्त व शिवसैनिक उपस्थित होते.
अडीच वर्षात कळमनुरीला दिले २ हजार ६०० कोटी
आपण मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या मागणीवरून कळमनुरी विधान सभा मतदार संघाच्या विकासांसाठी २ हजार ६०० कोटी रुपये दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवण करून दिले. विकास कामांसाठी जेव्हा जेव्हा (MLA Santosh Bangar) आ. संतोष बांगर यांनी निधी मागितला तेव्हा तेव्हा दिला आणि यापुढे ही त्यांच्या मतदार संघाला निधी कमी पडु देणार नाही, असे अभिवचन ही एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी दिले.