Desaiganj :- अतिदुर्गम, अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अज्ञान,अशिक्षित नागरीकांचे दारुच्या व्यसनामुळे आयुष्य बरबाद होत असल्याचे हेरून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात २ ऑक्टोबर १९९२ पासुन दारुबंदी लागु करण्यात मौलिक भुमिका बजावली.
चोर मार्गाने दारुची तस्करी करून जिल्ह्याच्या सभोवताल दारू विक्री सुरु
मात्र दारुबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्याऐवजी हप्तेखोरीत प्रचंड वाढ झाल्याचे चोर मार्गाने दारुची तस्करी (Liquor smuggling) करून जिल्ह्याच्या सभोवताल दारू विक्री सुरु आहे. अल्पावधीत झटपट श्रीमंत होण्याच्या नादात नकली व बनावटी दारूची तस्करी करून विक्री सुरु केल्याने देसाईगंज तालुका पुरता विळख्यात सापडला असल्याचे तीन महिण्यात अनेक मद्यपींचा लिव्हर सिरोसीसने मृत्यु झाल्याची गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती समोर येऊ लागल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांशी नागरिक डोंगर दर्याखोर्यांत राहणारे असुन शिक्षणाच्या अभावामुळे द्रारिद्यात खितपत पडुन आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय असून निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात पैसा खेळत राहात नसल्याने दारुच्या आहारी गेलेले अल्प किंमतीत मिळणार्या हातभट्टीच्या दारुवर तहान भागवू लागले तर कुणी देशी दारुवर तहान भागवू लागले आहेत.
फॅटी लिव्हरचे रुपांतर हळुहळु लिव्हर सिरोसीस मध्ये होऊन अनेकांचा अकाली मृत्यु
दरम्यान सुशिक्षित समजल्या जाणार्या पण व्यसनाच्या आहारी गेलेल्या मद्यपीसाठी ब्रँडेड लेबल लावलेली पण नकली व बनावटी दारू ब्रँडेड दारुपेक्षा कमी किमतीत सहज व घरपोच उपलब्ध होऊ लागल्याने आपसुक हा वर्ग ब्रँडेड विदेशी दारुच्या आहारी गेला. हळुहळु नकली व बनावटी दारुचे परिणाम फॅटी लिव्हर च्या स्वरुपात समोर येऊ लागले असतांना अशा मद्यपिंनी वेळीच दारुला लगाम लावुन नियमित व्यायाम व लिव्हर टॉनिक घेणे क्रमप्राप्त असते.मात्र आहारी गेलेले याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच फॅटी लिव्हरचे रुपांतर हळुहळु लिव्हर सिरोसीस मध्ये होऊन अनेकांचा अकाली मृत्यु झाल्याची धक्कादायक माहिती देसाईगंज तालुक्यातील एका वैद्यकीय अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटिवर दिली.




