राज्यभरात 114 आस्थापनांची तपासणी; 19 परवाने निलंबित, 16 जणांना अटक
मुंबई (Food and Drug Administration) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ, अवैध साठवणूक आणि निकृष्ट खाद्यपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 114 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातून सुमारे 9 कोटी 1 लाख रुपये किमतीचा, तब्बल 3 लाख 53 हजार 307 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. तसेच 19 आस्थापनांचे (Food and Drug Administration) परवाने निलंबित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे 20 लाख 20 हजार 190 रुपये किमतीचे 2 हजार 289 लिटर पतंजली गायीचे तूप जप्त करण्यात आले. तर भिवंडी येथील अव्हेन्यू सुपरमार्ट्स (डी-मार्ट) येथून 1 लाख 24 हजार 218 किलो खाद्यतेलाचा साठा ताब्यात घेण्यात आला.
प्रतिबंधित अन्नपदार्थांवरही कारवाई
28 ते 31 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष कारवाईत 79 लाख 40 हजार 571 रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या (Food and Drug Administration) प्रकरणांमध्ये 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 16 जणांना अटक करण्यात आली. याशिवाय सात आस्थापना सीलबंद करण्यात आल्या.
कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस
टाटा १एमजी मरीन कोलॅजेन पावडरच्या लेबलिंग आणि (Food and Drug Administration) जाहिरातीमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत टाटा हेल्थकेअर सोल्यूशन्स, एसीएफओ फार्मास्युटिकल्स, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुंबईत दहा आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबईतील कॅफे एम्पायर (माटुंगा), विशाल इंटरप्रायझेस (देवनार), न्यू बिकानेर स्वीट्स (घाटकोपर), खुशबू एंटरप्रायझेस (विक्रोळी), कोको ब्लिस कॅफे, द चॉकलेट हेवन आणि सागर मिल्क सेंटर (अँटॉप हिल), आरती इम्पेक्स (चेंबूर), सिंधुदुर्ग मसाला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (साकीनाका) आणि शिंदे मसाले दादरवाले (लोअर परळ) या दहा आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. महापे, तुर्भे, वाशी नाका आणि वाशी परिसरातील विविध आस्थापनांमधून मसाले, हिंग पावडर, खाद्यतेल, चारोळी आणि सुका मेवा जप्त करण्यात आला.
पुणे विभागात खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त
पुणे विभागातील सातारा येथील स्वाती ऑइल मिल्समधून 6 हजार 671 किलो, तर सोलापूरमधील एसजी ट्रेडर्समधून 6 हजार 235 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. साताऱ्यातील अमीन ट्रेडर्समधून 20 हजार 560 किलो तांदूळ, डाळी, गूळ आणि इतर खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
नागपुरात 53 लाखांचा अन्नसाठा जप्त
नागपूरमध्ये 20 आस्थापनांवर तपासणी करून 53 लाख 57 हजार 425 रुपये किमतीचे 37 हजार 414 किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले.
नाशिक आणि जळगावमध्येही कारवाई
नाशिक विभागांतर्गत नंदुरबार, अहिल्यानगर आणि धुळे जिल्ह्यांतही (Food and Drug Administration) अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. जळगावमध्ये अंबिका फूड्स मसाले, श्रीजी ट्रेडिंग आणि रमणलाल सन्स या आस्थापनांवर तपासणी करून अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. दिवाळीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच भेसळयुक्त व नियमबाह्य खाद्यपदार्थांची विक्री रोखता यावी, यासाठी प्रशासनाकडून ही विशेष मोहीम राबविण्यात आली.