भारत सायबर हल्ला

भारतावर सायबर हल्ल्यांचे सावट; AI मुळे धोका अधिक गंभीर

India Cyber ​​Attack: AI च्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आणि गंभीर आव्हान उभे राहिले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक सायबर हल्ल्यांना सामोरा जाणाऱ्या देशांपैकी एक

भारतावर सायबर हल्ल्यांचे सावट; AI मुळे धोका अधिक गंभीर

India Cyber ​​Attack

हल्ल्यांची गती, व्याप्ती आणि गुंतागुंत वाढली

महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेचे आव्हान

नवी दिल्ली (India Cyber ​​Attack) : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आणि गंभीर आव्हान उभे राहिले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक सायबर हल्ल्यांना सामोरा जाणाऱ्या देशांपैकी एक असून, AI च्या मदतीने या हल्ल्यांची गती, व्याप्ती आणि अचूकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

पूर्वी सायबर हल्ल्यांसाठी (India Cyber ​​Attack) माहिती गोळा करणे, लक्ष्य निश्चित करणे आणि फसवणुकीचे संदेश तयार करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर मानवी हस्तक्षेप आवश्यक होता. आता एआयच्या माध्यमातून समाजमाध्यमांवरील माहितीचे विश्लेषण करून लक्ष्यित ‘फिशिंग’ संदेश तयार करणे, बनावट ध्वनी-चित्रफिती तयार करणे आणि संगणकीय प्रणालींमधील सुरक्षा त्रुटी शोधणे अधिक वेगाने शक्य झाले आहे. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणारे ‘पोलिमॉर्फिक मालवेअर’ही मोठा धोका ठरत आहे.

पारंपरिक सुरक्षा यंत्रणा ज्ञात धोक्यांच्या नमुन्यांवर आधारित असल्याने सतत स्वतःमध्ये बदल करणाऱ्या हल्ल्यांना त्या अपुऱ्या ठरू शकतात. त्यामुळे (India Cyber ​​Attack) भारताने AI चा वापर सायबर हल्ल्यांसाठी होण्यापासून रोखतानाच, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून हल्ले वेळीच ओळखणे, तातडीने प्रतिसाद देणे आणि देशाची डिजिटल सुरक्षा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे.