अयोध्या राम मंदिर नियम

राम मंदिरात कडक नियम लागू; पुजाऱ्यांच्या मोबाईल वापरावरही बंदी!

Ayodhya Ram Temple: राम मंदिराच्या व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, मंदिरातील कर्मचारी, अधिकारी आणि पुजाऱ्यांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मंदिराच्या अंतर्गत व्यवस्थेशी संबंधित

राम मंदिरात कडक नियम लागू; पुजाऱ्यांच्या मोबाईल वापरावरही बंदी!

Ayodhya Ram Temple

अयोध्या (Ayodhya Ram Temple) : राम मंदिराच्या व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, मंदिरातील कर्मचारी, अधिकारी आणि पुजाऱ्यांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. मंदिराच्या अंतर्गत व्यवस्थेशी संबंधित माहिती अनधिकृतपणे बाहेर जाऊ नये, यासाठी ट्रस्टकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

राम मंदिर परिसरातील अंतर्गत माहिती लीक होण्यास आळा घालण्यासाठी प्रशासनाने गोपनीयतेवर विशेष भर दिला आहे. (Ayodhya Ram Temple) मंदिर परिसरात सुरू असलेल्या घडामोडी, प्रशासकीय निर्णय, सुरक्षा व्यवस्था किंवा व्यवस्थापनाशी संबंधित माहिती अनधिकृतपणे सार्वजनिक करू नये, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मंदिराच्या नव्या व्यवस्थेनुसार, परिसरात काय सुरू आहे, कोणते निर्णय घेण्यात आले आहेत किंवा प्रशासकीय पातळीवर कोणते बदल करण्यात आले आहेत, याबाबतची माहिती बाहेर शेअर करण्यास कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराच्या अंतर्गत व्यवस्थेबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यावर आता अधिक भर दिला जात आहे.

नव्या सीईओंनाही गोपनीयतेच्या सूचना

राम मंदिर ट्रस्टचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनाही (Ayodhya Ram Temple) मंदिराच्या अंतर्गत घडामोडींची गोपनीयता राखण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनीही मंदिराशी संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अनधिकृतपणे माहिती शेअर न करण्याचा तसेच व्यवस्थेची गोपनीयता कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

पुजाऱ्यांवरही निर्बंध; मोबाईल वापरावर बंदी

रामलल्लांच्या सेवेत असलेल्या पुजाऱ्यांसाठीही नियम कडक करण्यात आले आहेत. मंदिरातील अंतर्गत घडामोडी, सेवा व्यवस्था आणि इतर प्रशासकीय बाबींबाबतची माहिती सार्वजनिक करण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. याशिवाय मंदिरात सेवेदरम्यान पुजाऱ्यांना मोबाईल फोन वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

मंदिराच्या (Ayodhya Ram Temple) व्यवस्थेत करण्यात आलेल्या या बदलांमुळे अंतर्गत माहितीची गोपनीयता, शिस्त आणि प्रशासनावरील नियंत्रण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.

टैग्स: Ayodhya Ram Temple

संबंधित सामग्री

अयोध्या राम मंदिराच्या व्यवस्थापनाची धुरा जितेंद्र मिश्रा यांच्या हाती; पहिले CEO म्हणून निवड

अयोध्या राम मंदिराच्या व्यवस्थापनाची धुरा जितेंद्र मिश्रा यांच्या हाती; पहिले CEO म्हणून निवड

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 02, 2026
राम मंदिर देणगी प्रकरणावरून भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात; ‘गावागावात जाऊन जनतेसमोर हा मुद्दा मांडणार’

राम मंदिर देणगी प्रकरणावरून भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात; ‘गावागावात जाऊन जनतेसमोर हा मुद्दा मांडणार’

अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्या, पैसे आणि मौल्यवान दागिन्यांशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे.

Jul 13, 2026

अयोध्या राम मंदिराच्या देणगीतील  गैरव्यवहार प्रकरण सुप्रीम कोर्टात; केंद्र, यूपी सरकार आणि ट्रस्टला नोटीस

अयोध्या राम मंदिराच्या देणगीतील गैरव्यवहार प्रकरण सुप्रीम कोर्टात; केंद्र, यूपी सरकार आणि ट्रस्टला नोटीस

अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांच्या व्यवस्थापनात कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.

Jul 13, 2026
'आंदोलन दडपण्यासाठी ढगफुटीचा इशारा'; फडणवीसांवर सपकाळांचा गंभीर आरोप

'आंदोलन दडपण्यासाठी ढगफुटीचा इशारा'; फडणवीसांवर सपकाळांचा गंभीर आरोप

अयोध्या श्रीराम मंदिर दान प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसने नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिराबाहेर 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह आंदोलन आयोजित केले.

Jul 07, 2026