Delhi Viral Video

CJP आंदोलनात लाठीचार्ज! महिला आंदोलकांशी गैरवर्तनाचे आरोप; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आयोजित 'संसद चलो' मोर्चादरम्यान घडलेल्या घटनांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

CJP आंदोलनात लाठीचार्ज! महिला आंदोलकांशी गैरवर्तनाचे आरोप; व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Delhi Viral Video

CJPच्या 'संसद चलो' मोर्चादरम्यान व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ; अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, पोलिसांनी दावे फेटाळले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आयोजित 'संसद चलो' मोर्चादरम्यान घडलेल्या घटनांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. २० आणि २१ जुलै २०२६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी बलप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सीजेपीच्या म्हणण्यानुसार, जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला आणि विद्यार्थी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केला. महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप करत केस ओढणे, कपडे फाडणे आणि जबरदस्तीने बसमध्ये चढविण्यात आल्याचा दावा केला आहे.

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा करणारा एक तरुण दिसतो. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने चित्रीत केलेल्या दृश्यांमध्ये एका महिला आंदोलकाशी एका पोलिसाने अयोग्य पद्धतीने वर्तन केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मात्र, दिल्ली पोलिसांनी हे सर्व आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत. पोलिसांच्या स्पष्टीकरणानुसार, आंदोलकांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच जमावबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तेवढाच बलप्रयोग करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. महिलांशी गैरवर्तन झाल्याचे सर्व दावे पोलिसांनी "पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे" असल्याचे सांगितले.

दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोर्चादरम्यान तरुण-तरुणींना अमानुष मारहाण करण्यात आली. एका १२ वर्षांच्या मुलीचे डोके फोडण्यात आल्याचा, १५ ते १६ वर्षांच्या मुलींचे गळे पकडण्यात आल्याचा तसेच एका तरुणीचे कपडे फाडून तिच्या छातीवर पाय देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आणखी एका तरुणीच्या गळ्यावर काठीचे फटके मारण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

अभिजीत दिपके यांनी असा सवालही उपस्थित केला की, दिल्ली पोलिसांना आंदोलनातील विद्यार्थ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते का? तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणार आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दिपके यांनी पुढे सांगितले की, संसदेकडे निघालेला मोर्चा आणखी विद्यार्थ्यांना इजा होऊ नये म्हणून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या मते, पोलिसांकडे वॉटर कॅननसारखे पर्याय उपलब्ध असतानाही त्यांनी लाठीमाराचा मार्ग स्वीकारला. या घटनेनंतर जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर व्यापक चर्चा सुरू आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026