वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक

त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंदची ऐतिहासिक कामगिरी; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पटकावले पदक 

World Championship Medal: चिनी जोडी जिया यिफान आणि झांग शू जियान यांचा पराभव केला. या प्रभावी विजयासह, त्यांनी भारतासाठी किमान एक कांस्य पदक निश्चित करून इतिहास रचला आहे.

त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंदची ऐतिहासिक कामगिरी; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पटकावले पदक 

World Championship Medal

 

2011 नंतर जिंकणा-या  महिला दुहेरीमध्ये पदक

नवी दिल्ली (World Championship Medal) : भारताच्या बॅडमिंटनपटू त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत आपले पदक निश्चित केले आहे. शुक्रवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिना येथे झालेल्या महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी चिनी जोडी जिया यिफान आणि झांग शू जियान यांचा पराभव केला. या प्रभावी विजयासह, त्यांनी भारतासाठी किमान एक कांस्य पदक निश्चित करून इतिहास रचला आहे.

त्रिसा- गायत्रीच्या जोडीने केली कमाल
जागतिक क्रमवारीत 39 व्या स्थानावर असलेली भारतीय महिला दुहेरी जोडी त्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या जिया यी फॅन आणि झांग शू जियान यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्रिसा-गायत्रीने जिया आणि जियान यांचा 16-21, 21-15, 21-13 असा पराभव केला. या (World Championship Medal) सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिला गेम 16-21 ने गमावला. मात्र, त्यांनी दमदार कमबॅक करत दुसरा गेम 21-15 ने जिंकला. जबरदस्त कामगिरी कायम ठेवत त्यांनी तिसऱ्या आणि अंतिम गेममध्ये २१-१३ असा विजय मिळवला. या विजयामुळे भारताने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरी प्रकारात किमान एक पदक निश्चित केले आहे.

2011 नंतर भारत महिला दुहेरीमध्ये पदक जिंकणार
त्रिसा आणि गायत्री यांची ही (World Championship Medal) कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीच्या जोडीने पदक मिळवण्याची ही 15 वर्षांतील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी लंडन येथील स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. त्रिसा आणि गायत्री 2022 आणि 2023 मध्ये ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचल्या होत्या. त्यांनी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकही जिंकले होते आणि गेल्या वर्षीच्या सुरुवातीला अव्वल 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले होते.

सात्विक-चिरागकडूनही पदक जिंकण्याची अपेक्षा
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही पुरुष दुहेरीची जोडी देखील भारतासाठी आणखी एका पदकाच्या शर्यतीत आहे. पाचवे मानांकन असलेली ही भारतीय जोडी शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकन असलेल्या चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या जोडीशी सामना करेल. जर सात्विक आणि चिरागने हा सामना जिंकला, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे दुसरे पदक निश्चित होईल.