एआयचा गैरवापर

AI चा गैरवापर धोकादायक; अब्जावधींचे जीव धोक्यात: बिल गेट्स

Bill Gates: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) झपाट्याने वाढणाऱ्या क्षमतेमुळे भविष्यात गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिला आहे.

AI चा गैरवापर धोकादायक; अब्जावधींचे जीव धोक्यात: बिल गेट्स

Bill Gates

 

अत्याधुनिक एआयचा वाईट हेतूने वापर झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानीची शक्यता
नियमनासाठी सरकारने पुढाकार घेण्याचे आवाहन

वॉशिंग्टन (Bill Gates) : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) झपाट्याने वाढणाऱ्या क्षमतेमुळे भविष्यात गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी दिला आहे. एआयचा गैरवापर झाल्यास अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊन अब्जावधी लोकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.

एका कार्यक्रमात बोलताना गेट्स (Bill Gates) यांनी सांगितले की, एआय दिवसेंदिवस अधिक शक्तिशाली होत आहे. अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाईट हेतू असलेल्या व्यक्तींनी गैरवापर केल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवून आणणाऱ्या घटनांना चालना मिळू शकते. त्यामुळे एआयच्या संभाव्य धोक्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एआयच्या नियमनाची जबाबदारी केवळ तंत्रज्ञान कंपन्यांवर सोपवणे योग्य ठरणार नाही, असेही गेट्स यांनी नमूद केले. राजकारणी आणि कायदेनिर्मात्यांनी पुढाकार घेऊन एआयच्या वापराबाबत आवश्यक नियम आणि कायदेशीर चौकट तयार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. अमेरिकेत एआयबाबत कायदा करण्याची गरज आहे का, असा प्रश्न गेट्स यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “नक्कीच” असे स्पष्ट उत्तर देत एआयच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी प्रभावी नियमनाची गरज अधोरेखित केली.