NEET Paper Leak

धर्मेंद्र प्रधानांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी भेट;नीट वादावर सरकारची हालचाल?

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना बुधवारी नवे वळण मिळाले आहे.

धर्मेंद्र प्रधानांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी भेट;नीट वादावर सरकारची हालचाल?

NEET Paper Leak

नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना बुधवारी नवे वळण मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली असून, दोघांमध्ये सुमारे दहा मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्याचवेळी, त्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीकडून आंदोलन सुरू असून या आंदोलनाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.

विरोधकांच्या सातत्यपूर्ण गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज मागील दोन दिवसांपासून वारंवार तहकूब करावे लागत आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पडू शकलेले नाही.

दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत सरकार नीट पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याने या चर्चेनंतर सरकारकडून पुढील पाऊल काय उचलले जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधी यांनी ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच केले. नागरिकांना तक्रारी व आंदोलनांची माहिती नोंदवता येणार असून, विविध संघर्ष डिजिटल नकाशावर जोडले जाणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026