वन विभागाचा तपास सुरू
बालासोर (Odisha Orangutan Trafficking ) : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील जंगल परिसरात पाच तरुण ऑरंगुटान आढळून आल्याने वन विभागासह वन्यजीवप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. भारतात नैसर्गिकरित्या आढळत नसलेल्या या प्राण्यांचा जंगलात प्रवेश कसा झाला, याचा तपास वन विभागाकडून सुरू करण्यात आला आहे.
बालासोर जिल्ह्यातील भोगराई परिसरातील बदापाई गावाजवळील जंगलात मंगळवारी सकाळी स्थानिक नागरिकांना हे पाच ऑरंगुटान दिसले.(Forest Department) माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व प्राण्यांची सुरक्षित सुटका करून त्यांना वन विभागाच्या कार्यालयात हलवण्यात आले. तेथे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली.
ऑरंगुटान हे आग्नेय आशियातील इंडोनेशिया आणि मलेशियाच्या जंगलांमध्ये आढळणारे प्राणी आहेत.( Forest Department) त्यांचा भारतातील जंगलांमध्ये नैसर्गिक अधिवास नाही. त्यामुळे एवढ्या लहान वयातील पाच ऑरंगुटान एकाच ठिकाणी आढळणे संशयास्पद मानले जात आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते, (Forest Department) या प्राण्यांना स्वतःहून एवढ्या लांब अंतराचा प्रवास करून बालासोरपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना बेकायदेशीररीत्या भारतात आणून येथे सोडण्यात आले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.(Forest Department) मात्र, तस्करीबाबत अद्याप ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
वन विभागाकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू असून परिसरात आणखी असे प्राणी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. (Forest Department) तसेच वन्यजीव गुन्हे नियंत्रण यंत्रणेची मदत घेऊन या प्राण्यांचा मूळ स्रोत आणि त्यांना बालासोरपर्यंत आणणाऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बचाव करण्यात आलेल्या ऑरंगुटानना पुढील वैद्यकीय तपासणी आणि देखभालीसाठी भुवनेश्वर येथील नंदनकानन प्राणिसंग्रहालयात हलवण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. (Forest Department )या घटनेमुळे ओडिशातील किनारी भागातून होणाऱ्या संभाव्य वन्यजीव तस्करीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.