पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
कोलकाता (Congress Manifesto 2026) : पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल 2026 रोजी दोन टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. एकीकडे भाजप ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, जवळपास दोन दशकांत प्रथमच सर्व 294 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेस पक्षाने (West Bengal Election) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा (Congress Manifesto 2026) प्रसिद्ध केला आहे. यावेळी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते मंचावर उपस्थित होते. मल्लिकार्जुन खड़गे (Mallikarjun Kharge) यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा राज्याच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणे आणि बेरोजगारी दूर करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
#WATCH | Kolkata, West Bengal | Congress leader Ghulam Ahmad Mir said on the Congress manifesto, "...This manifesto is not a traditional manifesto. We formed a committee 6 months ago and did not copy from any book... We have tried to prepare this manifesto keeping in mind the… https://t.co/KnvJsEe7DE pic.twitter.com/KbwLp8MgX2
— ANI (@ANI) April 7, 2026
महिलांना दरमहा 2,000 रुपये, शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 रुपये
काँग्रेसने महिलांना दरमहा 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मोफत वीज आणि कृषी उत्पादनासाठी उत्तम खरेदी प्रणाली देण्याचेही आश्वासन दिले आहे.
AI आणि स्टार्टअप्सचा विकास
प्रत्येक जिल्ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्राचा विकास करण्याची आणि स्थानिक स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याची पक्षाची योजना आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुधारणांचा एक भाग म्हणून, काँग्रेसने (Congress Manifesto 2026) राज्यात 'कायद्याचे राज्य' प्रस्थापित करण्याचे वचन दिले आहे. जेणेकरून पक्ष किंवा पदाचा विचार न करता कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही.
कायदा आणि सुव्यवस्था आणि सुरक्षा
कायदा आणि सुव्यवस्था सुधारणांचा एक भाग म्हणून, पक्षाने राज्यात 'कायद्याचे राज्य' प्रस्थापित करण्याचे वचन दिले आहे, जेणेकरून पक्ष किंवा पदाचा विचार न करता कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी जलदगती न्यायालये, मोफत शिक्षण आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या सरकारी आरोग्य विम्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
भ्रष्टाचारविरोधी कारवाई
काँग्रेसने (Congress Manifesto 2026) भ्रष्टाचाराला एक गंभीर मुद्दा म्हटले आहे. एका मंत्र्याकडून 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जप्त करणे ही चिंतेची बाब असून, असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असे पक्षाने म्हटले आहे.