Shiv Sena Expansion

शिवसेनेचा देशभर विस्तार; एकनाथ शिंदेंचा राज्यप्रमुखांना ‘कृती आराखड्या’चा आदेश

महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण केलेल्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद आता देशातील अन्य राज्यांमध्ये वाढवण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचा देशभर विस्तार; एकनाथ शिंदेंचा राज्यप्रमुखांना ‘कृती आराखड्या’चा आदेश

Shiv Sena Expansion

१५ राज्यांच्या प्रमुखांना संघटन मजबूत करण्याच्या सूचना; सदस्य नोंदणी, क्रीडा स्पर्धा आणि ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनांवर भर

महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण केलेल्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद आता देशातील अन्य राज्यांमध्ये वाढवण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पक्षाच्या विविध राज्यांतील प्रमुखांना स्पष्ट दिशा दिली असून, संघटन विस्तारासोबतच स्थानिक पातळीवर जनतेशी जोडले जाण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांसह विविध राज्यांमध्ये पक्षाची उपस्थिती मजबूत करण्यासाठी पुढील काळात नियोजनबद्ध काम करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले.

नवी दिल्ली येथे शिवसेनेच्या विविध राज्यांच्या राज्यप्रमुखांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय विस्तारासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या १५ राज्यांतील राज्यप्रमुख तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना हा सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. पक्षाची राष्ट्रीय स्तरावर व्याप्ती वाढवण्यासाठी प्रत्येक राज्यात संघटनात्मक कामाला वेग देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

याच बैठकीत शिवसेनेकडून देशातील २५ राज्यांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली. आरोग्याच्या प्रश्नांबरोबरच शिक्षण, क्रीडा, रोजगार, महिला, पाणी, रस्ते आणि कृषी या विषयांवर स्थानिक पातळीवर प्रभावी काम करण्याच्या सूचना राज्यप्रमुखांना देण्यात आल्या.

सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवश्यक असेल तेव्हा संबंधित राज्यांमध्ये ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्याची भूमिका घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. त्यामुळे उत्तर भारतासह अन्य राज्यांमध्ये शिवसेना अधिक आक्रमकपणे संघटन उभारणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पक्षाची तळागाळातील पकड वाढवण्यासाठी आगामी काही महिन्यांत विविध राज्यांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची सूचनाही करण्यात आली. या माध्यमातून स्थानिक पातळीवर पक्षाशी नागरिकांचा संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी सर्व राज्यांतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यस्तरीय पदाधिकारी, महिला आघाडी प्रमुख, युवासेना तसेच इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यावर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले.

प्रत्येक राज्यप्रमुखाने आपल्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन तसेच आगामी निवडणुकांचा विचार करून पुढील दोन महिन्यांत पक्ष नेतृत्वाकडे ठोस ‘कृती आराखडा’ सादर करावा, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सर्व राज्यांमध्ये व्यापक ‘शिवसेना सदस्य नोंदणी अभियान’ राबवून पक्षाची संघटनात्मक पोहोच गावागावांत आणि घराघरांत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026