सोशल मीडिया बंदी

मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

Social Media Ban: मुलांच्या मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने 16 वर्षांखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

Social Media Ban

वेलिंग्टन (Social Media Ban) : मुलांच्या मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने न्यूझीलंड सरकारने 16 वर्षांखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान ख्रिस्टोफर लक्सन यांच्या पक्षाने प्रस्तावित केलेल्या विधेयकात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या समाजमाध्यम कंपन्यांवर त्यांच्या जागतिक महसुलाच्या 10 टक्क्यांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

लक्सन यांनी समाजमाध्यमांवरील हानिकारक सामग्री (Social Media Ban) आणि व्यसनाधीन तंत्रज्ञानामुळे मुलांच्या मानसिक आरोग्य, झोप, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली. मात्र, विधेयकाला संसदेत आवश्यक समर्थन मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. सत्ताधारी आघाडीतील न्यूझीलंड फर्स्ट पक्षाचे नेते विंस्टन पीटर्स यांनी प्रस्तावाला विरोध केला आहे.

मुलांना समाजमाध्यमांपासून दूर (Social Media Ban) ठेवण्याची जबाबदारी सरकारपेक्षा पालकांची असावी, असे त्यांचे मत आहे. ऑस्ट्रेलियाच्या अशाच कायद्याला त्यांनी ‘मोठे अपयश’ म्हटले. लक्सन यांनीही अंमलबजावणी आव्हानात्मक असल्याचे मान्य केले. मात्र, समस्या गंभीर असल्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित सामग्री

मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

Social Media Ban: मुलांच्या मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने १६ वर्षांखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे

Aug 24, 2026
१३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया खाते आता पालकांच्या संमतीशिवाय नाही; ‘शील्ड’ विधेयकात कडक तरतुदी

१३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया खाते आता पालकांच्या संमतीशिवाय नाही; ‘शील्ड’ विधेयकात कडक तरतुदी

लहान मुलांच्या वाढत्या डिजिटल वापरामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Aug 08, 2026