दिव्यांच्या वाईट गंभीर मतभेद

चेन्नईमधील अभिनेत्याचे पत्नी तामिळनाडूमंत्रींच्या परिवारातील संघर्ष, दावा करून घटस्फोट याचिकेचा फेरफोटा

कौटुंबिक न्यायालयात सज्जनता न घालून सिंगीतासोर्नलिंगमने दावा केला की जयविजयच्या विभक्तीच्या साठी घटस्फोटाची याचिका, त्यामुळे पाच वर्षाच्या प्रकरणाचं बंद करावं लागले.

चेन्नईमधील अभिनेत्याचे पत्नी तामिळनाडूमंत्रींच्या परिवारातील संघर्ष, दावा करून घटस्फोट याचिकेचा फेरफोटा

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा

चेन्नई () : अभिनेता आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या पत्नी संगीता सोर्नलिंगम यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे चेन्नईजवळील चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढले. विजय यांच्या चाहत्यांसह राजकीय आणि चित्रपट क्षेत्रात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात शुक्रवारी (दि. ७) या प्रकरणाची सुनावणी झाली. सध्या लंडनमध्ये असलेल्या संगीता यांनी दृकश्राव्य माध्यमातून सुनावणीला उपस्थिती लावली. घटस्फोटाच्या याचिकेवर पुढील कार्यवाही करण्याची इच्छा नसून ती मागे घ्यायची असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून याचिका मागे घेतल्याची नोंद केली आणि प्रकरण बंद केले.

संगीता यांनी वैवाहिक मतभेदांचा दाखला देत विजय यांच्यापासून विभक्त होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी यापूर्वी अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. ७ ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे विजय यांच्या चाहत्यांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

विजय आणि संगीता यांचा विवाह २५ ऑगस्ट १९९९ रोजी झाला. त्यांना जेसन संजय आणि दिव्या साशा ही दोन मुले आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून दोघांमधील मतभेद आणि विभक्त राहण्याच्या चर्चा सुरू होत्या. संगीता यांनी याचिका नेमक्या कोणत्या कारणामुळे मागे घेतली, याचे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे दोघांमध्ये समझोता झाला किंवा ते पुन्हा एकत्र राहणार, असा निष्कर्ष सध्या काढता येणार नाही.