ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर चिखल, चप्पल, बूट फेकले

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी याच्या ताफ्याला घेरले. या वेळी आंदोलकांनी 'चोर-चोर'च्या घोषणा देत त्यांच्या गाडीवर चिखल फेकल्याचा आरोप आहे.ही घटना बीजपूर येथे घडली.

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर चिखल, चप्पल, बूट फेकले

Mamata Banerjee

कोलकोता (Mamata Banerjee) : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज रविवारी उत्तर २४ परगणा जिल्ह्यात तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. एका मृत तृणमूल कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला घेरले. या वेळी आंदोलकांनी 'चोर-चोर'च्या घोषणा देत त्यांच्या गाडीवर चिखल फेकल्याचा आरोप आहे.ही घटना बीजपूर येथे घडली. मृत पक्ष कार्यकर्त्याच्या घरी जात असताना आंदोलकांच्या एका गटाने ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला घेराव घातला.

माध्‍यमांशी बोलताना बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, "माझ्या गाडीवर दगड, शूज आणि चिखल फेकून हल्ला करण्यात आला आहे. हा पूर्णपणे एक कट आहे. मी येथे येत असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली होती; तरीही पोलिसांनी सुरक्षेच्या आवश्यक त्या कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. सध्या संपूर्ण पश्चिम बंगालवर गुंडांचे राज्य सुरू आहे."

बॅनर्जी (Mamata Banerjee) या शांतताप्रिय भागात "शांतताभंग करण्यासाठी" आल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, निदर्शनादरम्यान त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.हलीसहर पोलिसांच्या कोठडीत असताना प्रकृती बिघडल्याने या तृणमूल कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

संबंधित सामग्री

निवडणूक आयोगाचा निर्णय; ममता बॅनर्जींच्या पक्षाला नवे नाव, ‘फुटबॉल प्लेअर’ चिन्ह

निवडणूक आयोगाचा निर्णय; ममता बॅनर्जींच्या पक्षाला नवे नाव, ‘फुटबॉल प्लेअर’ चिन्ह

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’

Sep 18, 2026
‘वोट चोरी, सरकार चोरी, आता पार्टी चोरी!’; राहुल गांधींचा हल्लाबोल

‘वोट चोरी, सरकार चोरी, आता पार्टी चोरी!’; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi: काँग्रेसवरील कारवाईचा संदर्भ देत यापूर्वीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाच्या वादांचाही उल्लेख केला. तसेच, भाजप आणि निवडणूक आयोग संगनमत करून विरोधी पक्षांमध्ये फूट

Sep 18, 2026
एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावर संजय राऊतांचा निशाणा; ‘गुजराती नेत्यांना खूश करण्यासाठी बोलले असतील’

एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावर संजय राऊतांचा निशाणा; ‘गुजराती नेत्यांना खूश करण्यासाठी बोलले असतील’

वडनगरमधील एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावर संजय राऊतांची टीका; TMC चिन्ह प्रकरण आणि शिवसेना सुनावणीवरूनही निवडणूक आयोगावर आरोप.

Sep 18, 2026
ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात आढळला मृतदेह

ममता बॅनर्जींच्या भाचीचा घरात आढळला मृतदेह

Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची बृष्टी मुखर्जी हिचा मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील घरात मृत्यू झाला.

Sep 01, 2026
ममता बॅनर्जींना मोठा धक्का? 100 टीएमसी नगरसेवकांनी दिला राजीनामा

ममता बॅनर्जींना मोठा धक्का? 100 टीएमसी नगरसेवकांनी दिला राजीनामा

TMC Mamata Banerjee: अंतर्गत संकट, राजीनामे आणि असंतोषाशी झुंजत असल्याचे दिसत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक नगरपालिकांमध्ये पक्षाची मूळ रचनाच विस्कळीत झाल्यासारखी दिसत

May 27, 2026