परभणी/सोनपेठ (Dharne protest) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मालवण येथे झालेल्या अवहेलनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात आज गुरूवारी एक तास धरणे आंदोलन करण्यात आले. या (Dharne protest) घटनेचा निषेध व्यक्त करून नायब तहसीलदार देवेंद्रसिंह चंदेल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
मालवण येथील राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आहे. हे आपल्या देवतांचा अपमान आहे.पुतळा कोसळल्या प्रकरणी जनतेमध्ये तिव्र संतापाची लाट पसरली आहे. संबंधीत गुत्तेदार व दोषी असणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या (Dharne protest) धरणे आंदोलनात अँड श्रीकांत विटेकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, तालुकाध्यक्ष दशरथ सुर्यवंशी, बळीराम काटे, उत्तमराव जाधव, बालाजी जयतपाळ,अजित देशमुख, गोपाळ भोसले, अशोक भुसारे, राकेश यादव, मंचक केदारे, गोपनीय जाधव, विष्णु जाधव, विष्णुपंत धोंडगे यांच्या अदी सहभागी झाले होते.