उमरखेड, मारेगावमधील रस्ते सर्वात घातक
शासकीय निधीतून दुरुस्ती कामांना गती
शासकीय निधीतून दुरुस्ती कामांना गती
यवतमाळ (District Accident spots) : जिल्ह्यात वाहतुकीसाठी वापरात असलेल्या रस्त्यांवर ज्या भागांमध्ये ५०० मीटरच्या आत तीन वर्षाच्या गोषवार्यातून सर्वाधिक अपघात होता. ज्यात पाच अपघातामध्ये दहा जण ठार किंवा गंभीर जखमी होता अशा भागांची नोंद ब्लॅक स्पॉट अशी केली जाते. यात यवतमाळ जिल्हातील उमरखेड व मारेगाव तालुक्यात रस्त्यांवर (District Accident spots) सर्वाधिक ब्लॅक स्पॉट आहेत. जिल्ह्यात अशी ६६ ब्लॅक स्पॉट नोंदविण्यात आली असून त्यांच्या दुरुस्तीची कामे शासकीय निधीतून पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गतच्या रस्त्यांवर १४ अपघात प्रवण स्थळ असून सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ क्षेत्रामध्ये ७,सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद क्षेत्रात १३, सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा अंतर्गत १६ तर सार्वजनिक बांधकाम विषेश प्रकल्प अंतर्गतच्या रस्त्यांवरील १६ ठिकाणे ही (District Accident spots) अपघात प्रवण स्थळ(ब्लॅक स्पॉट) म्हणून निश्चित करण्यात आलेली आहे.
सदर ठिकाणांची तातडीने तृटी दुरुस्ती करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले असून रस्ते सुरक्षा समिती अंतर्गत जिल्हा खनिकर्म विभाग व जिल्हा नियोजन समिती कडून त्यासाठी निधीची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यातील बँक स्पॉटची २९ कामे पूर्णत्वास आली असून २६ कामे प्रगती पथावर असल्याचे दिसून येत आहे. जे ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्यात आलेले आहेत. त्याची पाहणी उपप्रादेशिक परीवहन विभागाकडून करणे अपेक्षित असून त्यांच्या सकारात्मक अहवालानंतर (District Accident spots) ब्लॅक स्पॉटवर योग्य उपाययोजना झाल्याचे निश्चित होणार आहे.
तालुका निहाय असे आहेत ब्लॅक स्पॉट
जिल्ह्यात सर्वाधिक ब्लॅक स्पॉट(अपघात प्रवण स्थळ) उमरखेड,मारेगाव व यवतमाळ तालुक्यात आहेत. तर महागाव,पुसद व राळेगाव येथे ब्लॅक स्पॉट ची नोंद नाही. उमरखेड तालुक्यात १० ब्लॅक स्पॉट आहेत, तर मारेगाव तालुक्यातही १० स्पॉट आहे,यवतमाळ तालुक्यात ८, केळापूर तालुक्यात ५, वणी तालुक्यात ६,झरी तालुक्यात ६, बाभुळगाव तालुक्यात ४, दिग्रस तालुक्यात ३, कळंब तालुक्यात २, दारव्हा तालुक्यात ३, घाटंजी तालुक्यात ३, नेर तालुक्यात ३ तर आर्णी तालुक्यातील ३ ब्लॅक स्पॉट दुरुस्तीच्या कामांना गती दिली जात आहे.