वसमत (Gunj Tractor Accident) : वसमत तालुक्यातील गुंज येथील सात मजूर महिला ट्रॅक्टर अपघातात मयत झाल्या आहेत. (Gunj Tractor Accident) दुर्घटनेत मयत झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले व त्यांना अन्नधान्याच्या किटसचे वाटप करण्यात आले. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वसमत तालुक्यातील मौजे गुंज (Gunj Tractor Accident) येथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) हिंगोली जिल्हा परिषद मुख्याधिकारी अंजली रमेश, उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार सौ शारदा दळवी, पुरवठा निरीक्षणअधिकारी पांडुरंग हांडे, पुरवठा निरीक्षक बालाजी बोखारे मंडळ अधिकारी प्रियंका खडसे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, यांच्यासह महसूल अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल यांनी अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या समस्या ऐकून घेतल्या त्यांचे सांत्वन केले शासनाच्या विविध योजनांचा लाभ कुटुंबीयांना देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. यावेळी (Gunj Tractor Accident) अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्य गावातील सरपंच उपसरपंच व गावकरीमोठ्या संख्येने उपस्थित होते .