दिवसभर उन्ह तर सायंकाळी वादळी वार्यासह पावसाची हजेरी
शेतकर्यांसमोर नवे संकट
शेतकर्यांसमोर नवे संकट
जेवनाळा (District Heat-Rain) : गत काही दिवसांपासून उन्ह पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसभर उन्ह तापते तर सायंकाळी वादळी वार्यासह पाऊस हजेरी लावतो. मे हिट मुळे तापमानात अधिकच वाढ झाली आहे. कमाल तापमान ४४ अंशापर्यंत गेले होते. उन्ह पावसामुळे वातावरणात बदल होऊन नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. तसेच शेतकर्यांच्या (District Heat-Rain) उन्हाळी धान पिकाची काढणीचा हंगाम येऊन ठेपला असून अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून कापणी तसेच मळणीला ब्रेक देत शेतकर्यांनी सावध पवित्र घेतला आहे.
जनावरांची घ्या काळजी…
मनुष्य बुद्धिवान प्राणी असल्याने तो आपली स्वतःची व्यवस्था स्वतः करण्यात सक्षम आहे. मात्र मुक्या जनावरांना असह्य उन्हाळ्यात काळजीची नितांत गरज आहे. त्यांना सावलीत ठेवून वेळोवेळी पाणी पाजणे गरजेचे आहे. (District Heat-Rain) सकाळी आणि सायंकाळी शांत वातावरण असल्यामुळे जनावरांना बाहेर ठेवले तरी चालेल. मात्र दुपारी १० वाजे नंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवार्यात किंवा सावलीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
शक्य असल्यास उन्हात फिरणे टाळा…
शक्यतो सकाळी व सायंकाळच्या सत्रात कामाचे नियोजन करावे. जेणेकरून उष्णतेचा त्रास टाळण्याकरिता मदत होईल. महत्त्वाचे नसल्यास शक्यतो दुपारी ११ ते ५ पर्यंत उन्हात निघणे टाळावे.
शेतमजूर झाला शहाणा…
निसर्गाने बदल स्वीकारल्यानुसार शेतमजुरांनी सुद्धा कामाची वेळ बदलली आहे. अगदी (District Heat-Rain) सकाळी सहा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत शेतात काम करतात. त्यानंतर मात्र ते विश्रांती घेतात. शक्य असल्यास पुन्हा सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत शेतात खपतात.
काय घ्याल काळजी…
महत्त्वाचे काम असल्याने उन्हात जाणे भाग असल्यास डोके, कान, नाक कापडाने झाकूनच बाहेर निघावे. (District Heat-Rain) सोबत पाण्याची बाटली असावी. प्रवासात चहा, कॉफी व कॅफिनयुक्त शीतपेय घेणे टाळावे. लिंबू सरबत, लिंबू पाणी किंवा उसाचा रस सोयीने घ्यावा. प्रकृती अस्वस्थ वाटल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. उष्माघातग्रस्त व्यक्ती आढळल्यास तत्काळ १०८ वर संपर्क करावे.