विशेषबाबीतून जिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा!
लातूर (District Hospital) : लातूर येथे जिल्हा रुग्णालय उभारणीस यापूर्वी मान्यता मिळाली होती. मात्र मार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Health) राज्यातील काही आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय यांच्या बांधकाम प्रक्रियेस स्थगिती दिली होती. परिणामी लातूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयास मान्यता देण्यात यावी अशी मागणी माझं लातूर सह अनेकांची होती. लातूरकरांची अनेक दिवसांची मागणी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Guardian Minister Shivendrasingh Raje Bhosale) यांनी लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेषबाब म्हणून मंजूर करून घेतले आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी केलेल्या मध्यस्थीने या पाठपुराव्यास यश आले आहे. जिल्हा रुग्णालय उभारणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असल्याने लातूरकरांचे जिल्हा रूग्णालयाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात यावे याकरिता सातत्याने मागणी!
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्याने जिल्हा रुग्णालयाचे अस्तित्व संपुष्टात आलेले होते. लातूर येथे जिल्हा रुग्णालय नसल्याने शहरातील, जिल्हातील परजिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊन त्यांची मोठी अडचण होत होती, लातूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात यावे याकरिता सातत्याने मागणी केली जात होती. सदर अडचण लक्षात घेऊन
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि विशेषबाब म्हणून मंजूर करून घेण्यात यश आले आहे.
निकष बाजूला ठेवून सरकार मदत करणार!
चौकट मराठवाड्यासह लातूर जिल्ह्य़ातील खरीप हंगाम पूर्णपणे अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) हातचा गेला आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आँगस्ट पर्यंत नुकसान झालेल्यांना सरकारकडून २४४३५.३७ कोटी रुपयांची रक्कम तात्काळ खात्यात देण्यात येत असून उर्वरीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच मिळवून देणार असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दै.देशोन्नतीशी बोलताना सांगितले.