Yawatmal :- गोकुळाष्टमी, पोळा, गणेश उत्सव, ईद ए मिलाद, गौरी पूजन, नवरात्र उत्सव, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन या धार्मिक सण पार्श्वभूमीवर जातीय स्लोकार वृद्धिंगत करण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हास्तरीय शांतता सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.
अॅड.जयसिंग चव्हाण यांनी केला उपस्थित केला बालगुन्हेगारीचा मुद्दा
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. संजय देरकर आ. किसन वानखेडे उपस्थित होते तसेच पोलीस विभागातील (Police Department) इतर अधिकारी व ठाणेदार जिल्हास्तरीय शांतता सभेला उपस्थित होते. या बैठकीत शांतता कमिटीच्या काही सदस्यांनी आपले मनोगत या बैठकी दरम्यान व्यक्त केले या बैठकी दरम्यान अॅड जयसिंग चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले सण उत्सव साजरे होतात. परंतु सण उत्सव साजरे करताना प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार्या उपायोजना तोकड्या ठरतात . गोकुळाष्टमीला दहीहंडीच्या वेळी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसतात तर सण उत्सवाच्या काळात वाहतूकीला अडथळा निर्माण होतो सण उत्सव कुठल्याही समाजाचे असूद्या परंतु वाहतूकीची नियम मोडणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शहरातील वाढत्या बालगुन्हेगारी वर बोलतांना जयसिंग चव्हाण म्हणाले शहरातील वाढती बालगुन्हेगारी (Juvenile delinquency) अत्यंत धोकादायक असून अनेक बालगुन्हेगार कुख्यात गुन्हेगारांसारखे गुन्हे करत आहे.
मात्र पोलीस अशा बाल गुन्हेगारांवर योग्य कारवाई केली तर बालगुन्हेगारी थांबवू शकते. मात्र अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या बालगुन्हेगारावर योग्य कारवाई अभावी शहरात बालगुन्हेगारी फोफावली आहे.तर दुसरीकडे घाटंजी येथील एका पैशाच्या अपहार प्रकरणात पोलिसांचेच नावे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी व प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे अशी भूमिका अॅड. जयसिंग चव्हाण यांनी यावेळी मांडली.