हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) : जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुतळा परिसरासह मिरवणूक मार्गाची पाहणी केली. आज १४ एप्रिल रोजी सर्वत्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्या निमित्ताने हिंगोली शहरात प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूका काढल्या जातात. त्या निमित्ताने कुठेही अनुचित घटना घडू नये, या दृष्टीकोणातून पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
त्याच निमित्ताने १३ एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळा परिसरासह मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, पुतळा समितीचे अध्यक्ष मधूकर मांजरमकर,जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, हिंगोली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, प्रकाश इंगोले, प्रा. यु.एच. बलखंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी संपूर्ण पाहणी केल्यानंतर काही मार्गदर्शक सुचनाही केल्या.




 
			 
		

