वनअधिकार्याचा प्रताप
लोहारा/गायमुख (Landezri Forest) : वनांचे संरक्षण व संवर्धन व्हावे व स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून वनविभागाद्वारे वनातील बहुतांश कामे मजुराच्या हाताने केली जातात. मात्र वनाचे रक्षकच भक्षक झाल्याने ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ यापद्धतीने वनअधिकारी वरिष्ठांच्या आशिर्वादाने बोगस मजूर दाखवून लाखोचा डल्ला मारण्याचा प्रकार वनविभागात सुरू आहे.
तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रधिकारी (Landezri Forest) कार्यालयाअंतर्गत येणार्या बहुतांश बिटामध्ये सिबिओ व इतर कामे मजुरांमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र मजुरीचे मस्टर भरतेवेळी जास्तीचे बोगस मजुरांची नावे टाकून त्यांच्या नावे लाखो रुपये हडप केल्याचा पराक्रम येथील वनअधिकार्यानी केला असल्याने गरजू मजुरांवर अन्याय झाला आहे. याबाबद सखोल चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वनपरिक्षेत्रा अतर्गत येणार्या विषेशतः चिखली क्षेत्र कर्म्पारमेंट क्रमांक १४ व १६, रोंघा क्षेत्र कर्म्पारमेंट क्र.२८ व खापा २९ या बिटामध्येही वनविभागाद्वारे करण्यात आलेल्या विविध कामावर मोठ्या प्रमाणात बोगस मजूर दाखवून लाखोंचा अफरातफर करून शासकीय निधी हडप केल्याने कुपंणच शेत खात असल्याचा प्रकार (Landezri Forest) लेंडेझरी वनपरिक्षेत्राधिकार्यांकडून राजरोसपणे सुरू आहे. याकडे वरिष्ठ वनअधिकारी लक्ष देतील का? अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे.