परभणी शहरातील संजय गांधी नगरातील घटना कोतवाली पोलिसात नोंद!
परभणी (Divorce Case) : पतीने पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत तलाक दिला. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरुन पती विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात 30 जुलै रोजी गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. ही घटना परभणी शहरातील संजय गांधी नगर परिसरात घडली.
पतीने तीन वेळेस तलाक म्हणत पत्नीला दिला तलाक!
पत्नीने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, पती सय्यद सिराजोद्दीन याने मला तुझ्या सोबत राहायचे नाही असे म्हणत वाद घातला. यावर पत्नीने मला नांदायचे आहे, मी तुला सोडणार नाही असे म्हणाल्यानंतर, पतीने तीन वेळेस तलाक म्हणत पत्नीला तलाक दिला. बेकायदेशीररित्या तलाक दिल्या प्रकरणी मुस्लिम महिला विवाहच्या अधिकाराचे संरक्षण कायदा अंतर्गत पती सय्यद सिराजोद्दीन याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ह. ताटीकोंडलवार करत आहेत.