हिंगोली (Rural Jeevanonnati Abhiyan) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत मा मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष हिंगोली यांच्या वतीने वतीने स्वयंसाहाय्यता गटाचे दिवाळी फराळ स्टॉल चे उद्घाटन जिल्हा परिषद हिंगोली कार्यालयासमोर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक मनोहर वाकडे , लेखाधिकारी मनोज पिनगाळे, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग राम मेकाले, जिल्हा व्यवस्थापक विक्रम सारस्वत, ओमप्रकाश गलांडे, काळे, तालुका अभियान व्यवस्थापक राजू दांडगे, तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित, उज्वला गायकवाड, उपस्थित होते. गटाचे स्टॉल लावण्यासाठी प्रभागात महिलांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक श्री राजू दांडगे तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित, प्रभाग समन्वयक भगवान खिल्लारी, ज्ञानेश्वर कुंदर्गे, शिवाजी खोलगडे, दिनकर तपासे यांनी परिश्रम घेतले.
तसेच या प्रसंगी ईतर प्रभागाचे समन्वयक धाबे, लोखंडे, यांनी सुद्धा स्टॉल ला भेट दिली तसेच महिला बचतगटांच्या प्रतिनिधी यामध्ये लक्ष्मी बाई मुटकुळे, दुर्गा माता गट, श्री स्वामी समर्थ गट अनुराधा थोरात मालवाडी, जयभिम गट करवाडी वंदना कऱ्हाळे डिग्रस उपस्थित होते. प्रदर्शनात महिला बचतगटांनी तयार केलेले हळद, मिरची पावडर, दिवाळी फराळाचे विविध पदार्थ, आगास दिवे, विविध शेभेच्या हाताने तयार केलेल्या वस्तू,पणत्या यांचे आकर्षक बळसोंड, डिग्रस, नर्सि, कोथळज या प्रभागातून 4 स्टॉल लावण्यात आले होते. (Rural Jeevanonnati Abhiyan) ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी महिला बचतगटांच्या उपक्रमाचे कौतुक करून सांगितले की, “ग्रामीण भागातील महिलांनी उद्योगधंद्यात उतरून स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा, हीच खरी दिवाळीची भेट आहे.” या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.