डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ
अमरावती (Dr. Punjabrao Deshmukh) : समाजामध्ये विधिज्ञांच स्थान महत्त्वाचे आहे. आज राजकारण वेगळ्या दिशेने जात असतानाच इतिहासातून सर्वांनी माहिती घेत आपलं समाजातील स्थान उज्वल करावं. इतिहास हा शिक्षणासाठी असतो तो विसरण्यासाठी नाही, असं मार्गदर्शनपर उद्गार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा यांनी काढले.
डॉ.पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) विधि महाविद्यालय येथे आयोजित पदवी वितरण समारंभाला मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले होते. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अविनाश असनारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ.पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालयाच्या पदवी वितरण समारंभात एकूण 300 विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करण्यात आले.
कायद्याचे शिक्षण हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी कसे फलदायी ठरेल यासाठी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनातून केले. यावेळी विद्यापीठ व महाविद्यालयातून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्य अतिथींच्या हस्ते झाला. यासोबतच सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांनी सत्कार केला. एलएलबी तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यामध्ये संकेत बागडे याला सुवर्णपदक तसेच स्व. अप्पासाहेब वानखडे स्मृती मेरिट शिष्यवृत्ती आणि प्राचार्य स्व.एन.सी.देशमुख मेरिट शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय पारितोषिक निष्ठा शादानी हिला रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे प्रवीण रोडगे आणि राजेश कराळे यांना कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले. एल एल बी पाच वर्षीय अभ्यासक्रमातून गुणवत्ता यादीत आलेल्या मध्ये शरयू बिडवई हिला सुवर्णपदक आणि कै. जे. डी. पाटील सांगळूदकर स्मृती मेरिट शिष्यवृत्ती, शालिनी भुयार या विद्यार्थिनीला रौप्य पदक प्रदान करण्यात आले. तसेच अभय भेंडेकर आणि आसावरी खोत यांना कास्यपदक देऊन गौरविण्यात आले. एलएलएम दोन वर्षीय अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठातून प्रथम आलेला प्रतीक सगने याला सुवर्णपदकासह प्राचार्य एन. सी देशमुख स्मृती मेरिट शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत द्वितीय आलेला मनोज नरवाडे याला रौप्य पदकासह प्राचार्य एन. सी. देशमुख स्मृति मेरिट शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. शिवानी खापरे हिला कांस्यपदक देऊन सन्मानित केले. यासोबतच हिंदू लॉ या (Dr. Punjabrao Deshmukh) विषयात सर्वाधिक गुण मिळविलेला असित गुर्जर आणि अक्सा मिर्झा यांना कै. ॲड .बाबूराव पांगारकर स्मृती मेरिट शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच महाविद्यालयामधील पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. अर्चना अवघड, डॉ. रवींद्र मराठे, डॉ. मीनाक्षी काळे, डॉ. राजू डांगे यांचा सहभाग होता.
त्याचप्रमाणे सेटआणि नेट परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या मोना तायडे, रेणुका तळोकार, हेमलता आत्राम, वैभव इंगळे यांना मान्यवरांनी सन्मानित केले. अभिजीत खोत,खुशबू झांझोटे आणि प्रीती डोंगरे यांची जेएमएफसी न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख, संचालन डॉ. अर्चना अवघड यांनी केले. यावेळी (Dr. Punjabrao Deshmukh) व्यासपीठावर डॉ. एन. के. रामटेके, डॉ. राजेश पाटील, प्रा. संदीप वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.